उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; आठ जण अडकले

केदारताल (उत्तराखंड): उत्तराखंड राज्यातील केदारताल येथे हिमस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या स्थानी पर्यटनासाठी आलेल्यांपैकी आठ जण या हिमस्खलनामुळे अडकले आहेत. त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न राज्य प्रशासनाच्या आपत्कालीन साहाय्यता दलांकडून केला जात आहे. एनडीआरएफ, एसडीआरएएफ, वन विभाग आणि ट्रेकिंग विभाग यांच्याकडून बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे. केदारताल हे दुर्गम क्षेत्र असल्याने अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरचे साहाय्यही घेण्यात येत आहे. केदारताल परिसरातील कच्ची ढांग येथे हे आठ पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली.

 

Comments are closed.