आशिष शेलारांकडून मनसेच्या मराठी भाषा आंदोलनाची पहलगाम हल्ल्याशी तुलना, अविनाश जाधवांचं चोख प्रत

अविनाश आशिष वर जाधव घोषणा : मीरा रोड येथील एका अमराठी मिठाई दुकानदाराला मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ मीरा-भाईंदरमधील व्यापारी संघटनांनी बंद पुकारला होता. यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. आता भाजप नेते आशिष शेलार (आशिष घोषणा)) यांनी मनसेच्या (एमएनएस) मराठी भाषेच्या आंदोलनाची तुलना थेट पहलगम हल्ल्याशी केली आहे. तर मनसे नेते अविनाश जाधव (अविनाश जाधव) यांनी आशिष शेलार यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

आशिष शेलार पत्रकार परिषदेत म्हणाले की, पहलगमध्याय धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत. सरकारने तर याबाबत कडक पावले उचलावी. आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे. हे प्रकार वाढता कामा नये. मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करीन. अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी मनसेला दिला.

भाजपला उत्तर दिल्याशिवाय…

यावर मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, आशिष शेलार हे आम्हाला पहेलगामचे काय सांगत आहे? ज्यांनी मारले त्यांना पकडले का? महाराष्ट्रामध्ये राहायचे तर मराठी बोलावेच लागणार. भाजपचे राजकारण मतांसाठी आहे. राज ठाकरेंच्या भाषणाला अपूर्ण म्हणतात मात्र तुम्ही स्टेजवर आल्यावर पूर्ण झाले असते का? मराठीच्या बाबतीत चुकीचे बोलणार असेल तर गाठ मराठ्यांशी आहे. ज्यावेळी ते त्यांना खात आहेत का? भारतीय लोक पार्टीला नीट उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय.

…तर मोदी आणि शाहांनी तुम्हाला लाथ मारली असती

अविनाश जाधव पुढे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये राहून जय गुजरात बोलणे म्हणजे मराठी लोकांना राग येणारच आहे. कोकणात असे म्हणतात भावकीच्या नादात लागू नका, भावकी एकत्र झाले तर कार्यक्रमच होतो. मराठी प्रेमी म्हणून अनेक लोक आले होते. तुम्ही लाचार आहात, तुम्ही आले असते तर मोदी आणि शाहांनी तुम्हाला लाथ मारली असती. जे आले त्यांचं आम्ही स्वागत केलं आहे, असेही त्यांनी म्हटले.

आशिष शेलारांवर विजय वडेट्टीवारांची टीका

आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दोन भाऊ एकत्र आल्यामुळे शेलार यांना पहलगम आठवायला लागलं आहे. तुम्ही पाकिस्तानात जाऊन शंभर अतिरेकी मारल्याचं छाती ठोकून सांगत आहेत. मात्र, पहलगामाचे चार आतंकवादी अजून सापडलेले नाही,पुलवामामध्ये अडीचशे किलो आरडीएक्स आलं, तुम्ही लोकांना वारंवार मूर्ख बनवू शकत नाही, त्यामुळे यांची भीती साहजिक आहे. दोन भाऊ एकत्र आल्यामुळे शेलार यांची पंचायत झाली आहे, म्हणून ते असं वक्तव्य करत असल्याचे टीका विजय वडेट्टीवार यांनी आशिष शेलार यांच्यावर केली.

https://www.youtube.com/watch?v=uswkc-5bchs

आणखी वाचा

Ashish Shelar On Raj Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची टीका आशिष शेलारांच्या जिव्हारी; विजयी मेळाव्यावरुन हल्लाबोल, म्हणाले, अंधारात

आणखी वाचा

Comments are closed.