टीम इंडियामध्ये बदल! BCCI ने जाहीर केली रिप्लेसमेंट, रिंकू सिंग उपकर्णधार

रजत पाटीदारने सध्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघातून माघार घेतली आहे. आगामी एसीसी रायझिंग स्टार्स आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या भारत ‘अ’ संघात रजतचा समावेश होता, मात्र त्याने आपल्या सध्याच्या दुखापतीमुळे ५० षटकांच्या फॉरमॅटसाठी निवड होऊ नये, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) कळवले आहे.

रजतच्या निर्णयानंतर पुरुष निवड समितीने त्याच्या बदली खेळाडूची रविवारी (८ नोव्हेंबर) घोषणा केली. रजतला संघात घेतले होते, तेव्हा त्याला उपकर्णधारपद दिले होते, मात्र आता तो संघातून बाहेर झाल्याने हे पदही रिक्त झाले आहे.

निवड समितीने रजतच्या जागी आयुष बडोनीला संघात घेतले असून, रिंकू सिंगवर उपकर्णधारापदाची जबाबदारी सोपवली आहे. १९ नोव्हेंबरपासून एसीसी रायझिंग स्टार्स आशिया चषक दोहा येथे खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व तिलक वर्मा करणार आहे.

संघामध्ये अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी यांचाही सहभाग आहे. तसेच संघात प्रभसिमरन सिंग आणि कुमार कुशाग्रा या विकेटकिपर्स-फलंदाजांचीही निवड करण्यात आली आहे.

भारत ‘अ’ संघाला ‘ब’ गटामध्ये संयुक्त अरब अमिरात (UAE), नेपाळ आणि पाकिस्तान ‘अ’ संघांसोबत ठेवण्यात आले आहे. ‘अ’ गटामध्ये बांगलादेश ‘अ’, श्रीलंका ‘अ’, अफगाणिस्तान ‘अ’ आणि हाँगकाँग, चीन यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना रविवार, २९ नोव्हेंबर रोजी होईल.

रायझिंग स्टार्स आशिया चषक स्पर्धेसाठी अपडेटेट भारत अ चा संघ – अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), तिलक वर्मा (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार)कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विपराज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियन, हर्षित राणा, प्रिन्स यादव, अर्शद खान, आयुष बडोनी.

(रायझिंग स्टार्स एशिया कपमध्ये रजत पाटीदारच्या जागी आयुष बडोनी आणि रिंकू सिंग भारत अ संघाचा उपकर्णधार असेल)

Comments are closed.