कृष्णा आंदेकरचा जवळचा शुटर लागला पोलिसांच्या गळाला; आयुषच्या हत्येसाठी पुरवलेलं पिस्तुल, भाच्या

पुणे : पुण्यातील नाना पेठ परिसरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या आयुष कोमकर (Aysuh Komkar Case) खून प्रकरणात फरार असलेला आरोपी मुनाफ पठाण अखेर पोलिसांच्या (Pune Police) ताब्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली असून, आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासात उघड झाले आहे की, मुनाफ पठाणने आयुष कोमकरच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तुल पुरवले होते. त्यामुळे या हत्याकांडात त्याचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल करून आरोपी करण्यात आले आहे. मुनाफ पठाण हा कुख्यात शूटर कृष्णा आंदेकरचा जवळचा सहकारी मानला जातो. वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रचलेल्या कटामध्ये त्यानेही सहभाग घेतल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.(Ayush Komkar murder Case)

कृष्णा आंदेकर जवळचा शुटर

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष कोमकर प्रकरणातील फरार आरोपी मुनाफ पठाण याला गुन्हे शाखेने अटक केली. मुनाफ पठाण याने पिस्टल पुरवले असल्याचं गुन्ह्यात निष्पन्न झालं आहे. आज त्याला कोर्टात हजर करणार आहेत. मर्डर प्रकरणात मुनाफ पठाणचा हात असल्याचं निष्पन्न झाल्याने त्यालाही आरोपी केला आहे. वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जो कट रचला त्यामध्ये मुनाफ पठाण ही सहभागी होता. तो कृष्णा आंदेकर जवळचा शुटर आहे.

आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी पुणे पोलिसांना हवा असलेला कृष्णा आंदेकर मंगळवारी (दि.१६) सकाळी समर्थ पोलिसांना शरण आला. त्यामुळे बंडू आंदेकर टोळीचे प्रमुख चेहरे असलेले सर्वच जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने (दि.५) आयुष कोमकरचा खून केला होता. आयुषचा लहान भाऊ ए. डी. कॅम्प परिसरात खासगी क्लाससाठी गेला होता. त्याला घेण्यासाठी आयुष गेला होता. क्लासवरून आल्यानंतर घराच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करत असताना आयुषवर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता.

उद्यानात आता पोलिसांनी व्होदुरू अंदकार (सहावा) ०), शिवम उर्फ ​​शुभान अंदेकर उदयक उदयकंत अंडकर (२१), शिवराजकांत आणिंकर (२)) आणि लक्ष्मी यांनी युक्तिवाद केला आहे. कचरा () ०), अमन युसुफ पठाण (२ ,, सरना पेथ), सुजल राहुलू मेर्गू (२०, भवानी पेथ), यश सिद्धेश्वर पाटील (१ ,, डोघिही रा. त्यांनी मार्वारी (सकाळी डी .१ d.१6) यांनी आत्मसमर्पण केले. आता पोलिसांनी पोलिसांना अटक केली आहे. आयश कोमकर आणि आयुष कोमकर आणि आयुष कोमकर यांनी आयश कोमकर हत्येच्या सर्व हालचालीवर.

कृष्णा आंदेकर घाबरूनच शरण आल्याची चर्चा

कृष्णा आंदेकरचा वडील बंडू आंदेकर टोळीच्या १२ जणांना न्यायालयात हजर केल्यानंतर बंडू आंदेकर याने कृष्णा आंदेकर याची माहिती दे, नाहीतर त्याला थेट गोळ्या झाडू, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचे न्यायालयात सांगितले. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी आरोपीने केलेले सर्व आरोप न्यायालयासमोर फेटाळले होते. मात्र, गोळ्या झाडू ही खबर कृष्णा आंदेकर याला लागल्याने तो घाबरून समर्थ पोलिसांसमोर हजर झाल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा

Comments are closed.