आयुषा महात्रेची तुफनी फटबाजी, शार्दुलचा आगास ओकानारी गोंडाजी, मुंबईचा धमाकेदार विजया विजया.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 च्या लीग सामन्यात मुंबईने आयुष म्हात्रेच्या (Ayush Mhatre) तुफानी फलंदाजी आणि कर्णधार शार्दुल ठाकुरच्या (Shardul Thakur) घातक गोलंदाजीच्या जोरावर छत्तीसगडचा 8 विकेटने (Mumbai Beat Chhattisgarh) पराभव केला. दुसऱ्या सामन्यात पुडुचेरीने बंगालवर 81 धावांनी (Puducherry Beat Bengal) मोठा विजय मिळवला.
आयुष महात्रेच तुफानी रूप कायम
मुंबईकडून खेळणारा युवा सलामीवीर आयुष म्हात्रे सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या स्पर्धेत त्याने सातत्याने धावा काढत सर्वांचे लक्ष वेधले आहे. आधी विदर्भविरुद्ध शतक, मग आंध्रविरुद्ध शतक आणि आता छत्तीसगडविरुद्ध दमदार अर्धशतक झळकावत त्याने मुंबईच्या विजयात मोठा वाटा उचलला. छत्तीसगडविरुद्ध म्हात्रेने 140.82 चा स्ट्राइक रेट 49 चेंडूत 69* धावा केल्या. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 5 षटकार लगावले.
सीएसकेने केला आयुष म्हात्रेचा रिटेन
आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने आयुष म्हात्रेला रिटेन केले आहे. आयपीएल 2025 मध्ये पदार्पण करणाऱ्या या 18 वर्षीय खेळाडूने 7 सामन्यांत 189 च्या स्ट्राइक रेटने 240 धावा केल्या होत्या. त्याच्या नावावर एक दमदार अर्धशतकही नोंद आहे. पुढील हंगामात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
मुंबई–छत्तीसगड सामन्यात काय घडलं?
मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकुरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, आणि तो अचूक ठरला. मुंबईने छत्तीसगडला फक्त 19.4 षटकांत 121 धावांत गुंडाळले. छत्तीसगडसाठी आयुष शशिकांत पांडेने सर्वाधिक 25 धावा केल्या. मुंबईकडून शार्दुल ठाकुरने 3 विकेट घेतल्या. तुषार देशपांडे, अथर्व अंकोलेकर आणि सूर्यांश शेडगे यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या, तर शम्स मुलानीला 1 विकेट मिळाली.
122 धावांच्या लक्ष्याचा पीछा करताना मुंबईने 15.5 षटकांत फक्त 2 विकेट गमावून सामना जिंकला. आयुष म्हात्रे 69* धावा, अजिंक्य रहाणे 40 धावा, सरफराज खान 7 धावा केल्या. छत्तीसगडकडून शुभम अग्रवालने दोन्ही विकेट घेतल्या.
शमीचे 3 विकेट, तरीही बंगालचा पराभव
दुसरीकडे बंगाल व पुडुचेरी यांच्यातील सामन्यात बंगालचा दारुण पराभव झाला. 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगालची संपूर्ण टीम फक्त 96 धावांत बाद झाली. पुडुचेरीकडून कर्णधार अमन खानने 74 धावांची शानदार खेळी खेळली. बंगालकडून मोहम्मद शमीने 4 षटकांत 34 धावा देत 3 विकेट घेतल्या. करन लालने सर्वाधिक 40 धावा केल्या. पुडुचेरीच्या जयंत यादवने 4 षटकांत 28 धावा देत 4 विकेट घेतल्या आणि बंगालची वाट लावली.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.