2 सामन्यात 214 नाबाद… 19 षटकार! आयुष म्हात्रेचं ‘बॅक-टू-बॅक’ शतक, मुंबईचा 9 विकेट्सने विजय


Ayush Mhatre Back-To-Back Centuries In Syed Mushtaq Ali Trophy  : एकीकडे रांचीमध्ये विराट कोहलीने आपल्या शतकाने फॅन्सची मने जिंकली, तर दुसरीकडे लखनऊमध्ये केवळ 18 वर्षांच्या युवा आयुष म्हात्रेने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत धुमाकूळ घातला. म्हात्रेने सलग दुसरे शतक ठोकत सर्वांच थक्क केले. केवळ 59 चेंडूत नाबाद 104 धावा करत त्याने आंध्रच्या गोलंदाजांना धू धू धुतले. 5 चौकार आणि तब्बल 9 षटकारांच्या जोरावर म्हात्रेने मुंबईला 160 धावांचे लक्ष्य 28 चेंडू राखून गाठून दिले आणि 9 विकेट्सने विजय मिळवून दिला.

म्हात्रेचा 'बाक-तू-बॅक'

आयुष म्हात्रेने याआधी विदर्भविरुद्धही नाबाद शतक ठोकले होते. म्हणजे दोन सामन्यांत 214 धावा… आणि एकदाही बाद झाला नाही. आतापर्यंत 3 सामन्यांत 232 धावा ठोकत म्हात्रेने चालू हंगामातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून आपली छाप सोडली आहे. त्याने आतापर्यंत 19 षटकार ठोकले आहेत.

मुंबईच्या विजयात तुषार देशपांडे आणि सूर्यकुमार यादव यानेही मोलाचे योगदान दिले. देशपांडेनं 4 षटकांत 25 धावा देत 3 बळी टिपले. तर सूर्यकुमारने 21 चेंडूत नाबाद 31 धावा काढत म्हात्रेसोबत 105 धावांची भागीदारी रचली. भारत अंडर-19 संघाचा कर्णधार असलेला आयुष म्हात्रे आपली स्वप्नवत फॉर्म कायम ठेवत आहे. रविवारी झालेल्या ग्रुप ए सामन्यातही त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आणि मुंबईची आंध्रवर 9 विकेट्सने भक्कम मात झाली.

अभिषेक शर्माचाही तुफानी कहर

रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात पंजाबचा डावखुरा धडाकेबाज अभिषेक शर्मा संपूर्ण चर्चेचा विषय ठरला. शमी आणि आकाशदीपसारख्या अनुभवी गोलंदाजांचा भडिमार झेलत अभिषेकने फक्त 52 चेंडूत 148 धावा ठोकल्या. 16 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने त्याने बंगालच्या गोलंदाजांना धूतले. फक्त 12 चेंडूत अर्धशतक आणि 32 चेंडूत शतक ठोकले. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे पंजाबने तब्बल 310 धावा उभारल्या. प्रत्युत्तर बंगालचा कर्णधार अभिमन्यु ईश्वरनने 66 चेंडूत नाबाद 130 धावा केल्या, तरीही त्यांची टीम 112 धावांनी पराभूत झाली.

हे ही वाचा –

कोहली-रोहित चमकले, पण दक्षिण आफ्रिकेने घाम फोडला! रांचीत वनडेत शेवटच्या षटकात टीम इंडियाचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

आणखी वाचा

Comments are closed.