बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण! पत्नीची उच्च न्यायालयात याचिका करत SIT स्थापन करण्याची मागणी
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात महत्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी शेहझीन सिद्दीकी यांनी केली आहे. याचिकेत मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. हत्येचे खरे गुन्हेगार पकडण्यात मुंबई पोलिसांना अपयश आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
तपास दिशाभूल करणारा असून अर्ध्यावर सोडण्याचा आरोप
चौकशी दरम्यान दिलेल्या जबाबाकडे कानाडोळा केल्याचा आरोप बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शेहझीन सिद्दीकी यांनी केला आहे. हत्येत राजकीय आणि प्रभावशाली व्यक्तींच्या हस्तक्षेपाच्या छटा असून अशा व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप देखील याचिकेत करण्यात आला आहे. तपास दिशाभूल करणारा असून अर्ध्यावर सोडण्याचा देखील याचिकेत आरोप आहे. डोंगर पोखरून उंदीर काढल्याचा याचिकेत म्हटलं आहे. पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. 12 ऑक्टोबर 2024ला बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती
माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder Case) यांची 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्याच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. विरोधकांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रात मोठा वावर असणाऱ्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनं महाराष्ट्र हादरून गेला होता. बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे बिश्नोई गँग असल्याचं बोललं जात होतं. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने य हत्येची जबाबादारी घेतली होती. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची टोळी अनेक राज्यांमध्ये पसरली असून त्यांच्याकडे 700 हून अधिक शूटर्स असल्याचं एनआयएच्या आरोपपत्रात उघड झालं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं 1990 च्या दशकात आपल्या टोळीचा विस्तार केला होता. त्याच पद्धतीनं बिश्नोई आणि त्याची टोळी पुढे जात असल्याचा दावा एनआयएनं केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण! मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केलं अटक, हत्येच्या कटात सहभाग असल्याची माहिती
आणखी वाचा
Comments are closed.