कर्णधार म्हणून पहिला PSL किताब जिंकला… पण फायनलमध्ये बाबर आजमचा झाला पोपट; पाकिस्तानमध्ये नेमकं
बाबर आझमने कर्णधार म्हणून पहिले T20 विजेतेपद पटकावले PSL 2026 : बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पेशावर झाल्मीने पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2026 च्या अंतिम सामन्यात हैदराबाद किंग्समेनचा 5 गडी राखून पराभव करत जेतेपदावर नाव कोरले. पेशावर झाल्मीचे हे दुसरे पीएसएल जेतेपद आहे, तर कर्णधार म्हणून बाबर आझमची ही पहिलीच ट्रॉफी ठरली आहे.
हैदराबाद किंग्समेनचा फलंदाजीतील फ्लॉप शो
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद किंग्समेनची अवस्था अत्यंत बिकट झाली. पेशावरच्या प्रभावी गोलंदाजीसमोर हैदराबादचा संपूर्ण संघ केवळ 129 धावांवर गारद झाला. विशेष म्हणजे, हैदराबादचा संघ पूर्ण 20षटकेही खेळू शकला नाही आणि 18 व्या षटकातच त्यांचा डाव आटोपला.
— pctmedia 🗂️ (@media_pct) ३ मे २०२६
पेशावर झाल्मीचा विजय
130 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पेशावर झाल्मीने 15.2 षटकांत 5 गडी राखून विजय मिळवला. या विजयाचा खरा शिल्पकार आरोन हार्डी ठरला. त्याने गोलंदाजीमध्ये 4 बळी घेतले आणि फलंदाजीत नाबाद 56 धावांची अर्धशतकी खेळी करून संघाला चॅम्पियन बनवले. त्याला अब्दुल समदने 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून मोलाची साथ दिली.
बाबर आझमचा ‘पोपट’, नेमकं काय घडलं?
पेशावर झाल्मी जिंकली असली, तरी वैयक्तिकरीत्या बाबर आझमसाठी हा सामना निराशाजनक ठरला. 130 धावांचा पाठलाग करताना बाबर आझम पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर ‘गोल्डन डक’ (पहिल्याच चेंडूवर शून्य धावेवर बाद) झाला. त्याला मोहम्मद अलीने बाद केले. पेशावरने पहिल्याच षटकात दोन मोठे गडी गमावले होते, ज्यामुळे एकवेळ संघ अडचणीत येईल असे वाटले होते.
पीएसएलमध्ये बाबर आझमचा विक्रम हुकला
पीएसएल 2026 मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या बाबर आझमचा विक्रम हुकला. एकाच पीएसएल हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तो केवळ एका धावेने हुकला. बाबरने या हंगामात 588 धावा केल्या. फखर जमानने 2022 मध्ये तेवढ्याच धावा केल्या होत्या. जर बाबरने अंतिम सामन्यात एक धाव जरी केली असती, तर तो एकाच पीएसएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला असता. मात्र, पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यामुळे त्याचा विक्रम हुकला. बाबर आझमने पीएसएल 2026 मध्ये 11 सामन्यांमध्ये 73.5 च्या सरासरीने 588 धावा केल्या, ज्यात दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.