IPL 2026 – मित्तल आणि पूनावाला राजस्थानचे नवे मालक
राजस्थान रॉयल्सच्या संघाला आता नवीन मालक मिळाले आहेत. ज्येष्ठ उद्योगपती आणि स्टील व्यावसायिक लक्ष्मी मित्तल, त्यांचे पुत्र आदित्य मित्तल यांनी सिरम इन्स्टिटय़ूटचे अदर पूनावाला यांच्यासोबत राजस्थान रॉयल्स संघ विकत घेण्याचा करार केला आहे. राजस्थान रॉयल्सचा संघासहीत संपूर्ण मालकी विकत घेण्यासाठी त्यांना अंदाजे 1.65 अब्ज डॉलर्स (अंदाजे 15,600 कोटी रुपये) मोजावे लागले आहेत.
संघाची मालकी किती टक्के कोणाकडे असणार…
या नवीन करारामुळे राजस्थान रॉयल्सच्या संचालक मंडळाची रचना पूर्णपणे बदलली आहे. संघात मित्तल पुटुंबाकडे 75 टक्के बहुसंख्य हिस्सा असेल. अदर पूनावाला यांच्याकडे 18 टक्के हिस्सा असेल. सध्याचे मालक मनोज बदाडे आणि अन्य काही गुंतवणूकदारांकडे उर्वरित 7 टक्के हिस्सा असेल. संघातील व्यवस्थापनामध्ये समन्वय राखण्यासाठी मनोज बदाडे संघासोबत जोडलेले राहतील.
संघाचा करार च्या फिस्कटला होईल
एका अहवालानुसार, कल सोमानी यांनी यापूर्वी राजस्थान रॉयल्सला विकत घेण्यासाठी यशस्वी बोली लावली होती, पण शेवटच्या क्षणी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, ज्यामुळे हा करार पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर मित्तल पुटुंब आणि अदर पूनावाला पुढे आले आणि त्यांनी हा करार पूर्ण केला. केवळ आयपीएलच नाही, तर संपूर्ण रॉयल्स परिवाराचे हक्क आता मित्तल आणि पूनावाला यांच्याकडे असतील. ही 1.65 अब्ज डॉलर्सची किंमत केवळ आयपीएल संघासाठी नाही. राजस्थान रॉयल्सच्या मालकीचे जगातील आणखी दोन प्रमुख संघ आहे. दक्षिण आफ्रिकेचा पार्ल रॉयल्स आणि पॅरिबियन प्रीमियर लीगचा बार्बाडोस रॉयल्स. या करारामध्ये या तिन्ही संघांचा समावेश आहे. पण अद्याप पूर्ण अंमलबजावणीसाठी अजूनही बीसीसीआय आणि आयपीएल गव्हार्ंनग काwन्सिलसारख्या प्राधिकरणांची मंजुरी आवश्यक आहे
Comments are closed.