आता इराणची अमेरिकेला डेडलाइन; होर्मुझची नाकेबंदी उठवा, 30 दिवसांत सैन्य मागे घ्या

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या सर्व डेडलाइन धुडकावून लावणाऱ्या इराणने आता अमेरिकेलाच डेडलाइन दिली आहे. इराणने ट्रम्प यांना 14 कलमी प्रस्ताव पाठवला आहे. पुढच्या 30 दिवसांत या मुद्द्यावर तोडगा काढा आणि युद्ध कायमचे संपवा, असे इराणने म्हटले आहे. होर्मुझभोवतीची नाकेबंदी उठवून सैन्य काढून घेण्याची अटही इराणने टाकली आहे.

इराणच्या अटी

  • इराणवरील सर्व निर्बंध हटवा!
  • अब्जावधी डॉलर्सची इराणी मालमत्ता परत कर.
  • युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या.
  • इस्रायल-लेबनॉन युद्ध थांबवा.
  • इस्रायल-लेबनॉनमधील शत्रुत्व कायमचे संपवा.
  • होर्मुझ सामुद्रधुनीसाठी नवीन व्यवस्था उभी करा.
  • भविष्यात इराणवर हल्ले न करण्याची हमी द्या.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे आता दोनच पर्याय आहेत. अशक्यप्राय लष्करी कारवाई किंवा वाईट करार. यापैकी एकाची निवड त्यांना करावी लागेल. चॉइस त्यांचा आहे – आयआरजीसी

Comments are closed.