शेतकरी कर्जमाफीवर बोलायचं नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, मंत्री बाबासाहेब पाटलांची कबुली
Babasaheb Patil : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil ) यांनी कराड (Karad) येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी सहकार मंत्र्यांचे अज्ञान समोर आले असून माध्यमांपासून पळ काढताना आढळून आले. तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलायचं नाही असं मुख्यमंत्री सांगितल्याची कबुली बाबासाहेब पाटील यांनी दिली.
बँका बुडवणाऱ्यांवर कारवाईसाठी सिस्टीममुळे वेळ लागत आहे
यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीला सरकारमधील कोणी आले नाही असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता, मंत्री म्हणाले की, मला याबाबत माहिती नाही. बँका बुडवणाऱ्यांवर कारवाईसाठी सिस्टीममुळे वेळ लागत असल्याचे मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले. लेखापरिक्षणात अ वर्ग तरी संस्था, बँका बंद पडतात. त्यावर कायदा दुरूस्ती करणार असल्याचे बाबासाहेब पाटील म्हणाले. कर्ज घेणाऱ्या आणि बुडवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होणार का? असं देखील त्यांना विचारण्यात आले, यावेळी सहकारमंत्री म्हणाले की, कारखान्यांची यादी पत्रकारांनीच द्यावी असे म्हणाले. मग सहकार खाते काय करतयं? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
कर्जमाफी विषयावर बोलायचं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले. कर्जमाफीमुळं सहकार खात्यावर किती बोजा कमी होईल, असा सवाल देखील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, आकडे काढावे लागतील.
31 जूनआधी कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही. यावर्षीचे कर्जबाजारी शेतकरीही या कर्जमाफीत बसले आहेत. एकनाथ शिंदेअजित पवार यांनी शब्द दिला आहे. दिलेला शब्द पाळला नाही, दगाफटका केला तर फासावर जाण्याची तयारी आहे”, असंही रोखठोक मत बच्चू कडूंनी यावेळी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Radhakrishna Vikhe Patil: ‘आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची’ आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
आणखी वाचा
Comments are closed.