पाच दिवसांचा ‘बाबूजी महोत्सव’

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सुधीर फडके ऊर्फ बाबूजी म्हणजे संगीतप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य करणारे गायक – संगीतकार. बाबूंजीची गाणी गात तीन पिढय़ा मोठय़ा झाल्या. त्यांची सोप्या सुरावटींची गाणी रसिकांच्या ओठांवर आजही सहज येतात. बाबूजींच्या सुरेल आठवणी जागवणारा पाच दिवसांचा ‘बाबूजी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा ’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे.  यामध्ये बाबूजींनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांचा सुरेल स्वराविष्कार बाल आणि किशोरवयीन मुले सादर करणार आहेत. काव्या खेडेकर, वैदेही परांजपे, श्रावणी वागळे, राज ठापुरदेसाई, अथर्व कर्णिक, हर्षवर्धन गोरे, संवादिका अनुश्री जोशी हे बालकलावंत हा कार्यक्रम सादर करतील.  संगीत संयोजन संदीप मेस्त्री यांचे आहे.

24 जुलै रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृह येथे  वेळ रात्री 8 वाजता, 25 जुलै रोजी गोरेगाव येथील कलाघर, नंदादीप स्पूल येथे सायंकाळी 7 वाजता, 26 जुलै रोजी मराठा मंडळ हॉल, मुलुंड पश्चिम येथे सायंकाळी 6 वाजता, 27 जुलै रोजी साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे  सायंकाळी 7 वाजता, 29 जुलै रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह विलेपार्ले, रात्री 8.30 वाजता असे पाच कार्यक्रम होतील. आर्च एंटरप्रायझेज आणि संध्याश्री क्रिएशन्स आयोजित या महोत्सवाची संकल्पना विनीत गोरे यांची आहे.  कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.  विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमाच्या एक दिवस आधी कार्यक्रमस्थळी सकाळी 9 वाजल्यापासून उपलब्ध होतील.

Comments are closed.