प्रभाकर कोलते @ 80! अमूर्त कलेचा वेध घेणारे प्रदर्शन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

1970 नंतरच्या कालखंडावर आपल्या अमूर्त शैलीचा ठसा उमटवणारे आणि अनेक तरुण चित्रकारांना प्रेरणा देणारे प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांचा 80 वा वाढदिवस येत्या 21 जुलै रोजी आहे. यानिमित्ताने त्यांच्या अमूर्त कला प्रवासाचा वेध घेण्याची पर्वणी कलाप्रेमींना मिळणार आहे. जहांगीर आर्ट गॅलरी, काळाघोडा येथे ‘इंप्रिंट्स ऑफ (ई) मोशन्स’ या खास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये प्रभाकर कोलते यांच्या 80 कलाकृती पाहता येतील.

ट्रेझर आर्ट गॅलरीच्या संचालिका टीना चंद्रोजी आणि संचालक परेश मकवाणा यांच्या पुढाकाराने ‘इंप्रिंट्स ऑफ (ई) मोशन्स’ हे प्रभाकर कोलते यांच्या कलाप्रवासाचा वेध घेणारे सेमी-रेट्रोस्पेक्टिव्ह प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.   प्रसिद्ध कला इतिहासकार व क्युरेटर जॉनी एम. एल. यांनी या प्रदर्शनाचे क्युरेशन केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन 21 जुलै रोजी संध्याकाळी 5.30 वाजता होईल. प्रदर्शन 26 जुलैपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत रसिकांसाठी खुले असेल.

प्रभाकर कोलते म्हणजे अमूर्त साधनेचे तपस्वी. त्यांच्या चित्रात आध्यात्मिक गहनता जाणवते, तर काही चित्रे म्हणजे अमूर्त काव्यच भासतात. याबद्दल ते म्हणतात, कलेचे खरे सामर्थ्य हुबेहूब चित्रण करण्यात नसून अदृश्य भावनांना व्यक्त करण्यात असते.

Comments are closed.