पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा, त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर; बच्चू कडू
बॅचू कडू: प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शेतकरी, शेतमजूर तसेच दिव्यांगांच्या मागण्यांसाठी गेल्या महिन्यात आठवडाभर अन्नत्याग आंदोलन केले होते. सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले असले तरी, ते अद्याप आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त बच्चू कडू यांनी पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा, त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर, असं साकडं घातलं आहे.
बच्चू कडू म्हणाले की, मी पांडुरंगाला साकडं घालतो की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मनात शेकऱ्यांप्रती चांगला विचार येऊ दे. नेहमी शहरीकरणाचा मुद्दा ते धरतात. जपानच्या तंत्रज्ञानावर शहराचा विकास होतो आणि इकडे पांदण रस्ते शेतकऱ्यांना जाण्यासाठी नाही. त्यामुळे पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात तू जा आणि त्यांच्या कानात कर्जमाफीसंदर्भात सांग. कर्ज माफीची तारीख जाहीर केली पाहिजे. त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर, असे त्यांनी म्हटले.
कवटीचे सरकार
बच्चू कडू पुढे म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांसाठी कुठे मर्दानगी दाखवत नसून हे नामर्दांचे सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी 56 इंचाची छाती दिसली पाहिजे. राम मंदिरात जे भाजपला पुण्य भेटलं. ते यांची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांच्या 1200 आत्महत्येचं पाप कुठे हे फेडणार? त्यांच्या धोरणामुळेच शेतकरी मरत आहेत, असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला.
कर्जमाफीची तारीख निश्चित करा
जोपर्यंत कर्जमाफीची तारीख निश्चित होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन कायम राहणार आहेत. येत्या दोन ऑक्टोबरला मुंबईत मोठा मोर्चा सुद्धा या विषयावर काढण्यात येणार आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळेवर भाजपने हिंदी सक्तीचा मुद्दा घेतला हीच तर भाजपची हुशारी आहे, असे देखील बच्चू कडू म्हणाले. दरम्यान, शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे घरावरील सोन्याचे कौल बसवण्यापेक्षा धोरण बदलले तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी त्यांना सक्षम करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.