कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर बच्चू कडूंच्या मोठ्या भावांनी व्यक्त केली भावना; म्हणाले, गाफील र
Farmers’ Protest: नागपूरकरांनी केलेल्या त्यागाबद्दल आभार
बच्चु भाऊ कर्जमाफीची तारीख जाहीर झाली, तरी आठ महिने सरकारवर बारीक लक्ष ठेवा. बच्चू कडू यांच्या दोन मोठ्या भावांनी आपल्या लहान भावाला महत्वाची सूचना केली आहे. आंदोलनामुळे तीन दिवस झालेल्या त्रासाबद्दल नागपूरकरांची माफी मागत नागपूरकरांनी केलेल्या त्यागाबद्दल आभारही मानले. बच्चू कडू यांच्या दोन ज्येष्ठ भावांनी कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर एबीपी माझा समोर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Farmers’ Protest: कर्जमाफीची गप्पा मारणाऱ्या सरकारच्या तोंडून
बच्चू कडू यांनी सरकारकडून कर्जमाफीची तारीख मिळवल्यानंतर त्यांच्या दोन्ही जेष्ठ बंधूंनी समाधान व्यक्त केलं आहे. मात्र सरकारने आठ महिन्यानंतरची तारीख दिल्यामुळे बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गाफील राहू नये. कर्जमाफी संदर्भात सरकारवर बारीक लक्ष ठेवावं अशी अपेक्षाही बच्चू कडू यांचे मोठे बंधू भैय्याजी कडू यांनी व्यक्त केली आहे. तर बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी यश मिळवून आणतील आणि कर्जमाफीची गप्पा मारणाऱ्या सरकारच्या तोंडून त्याची तारीख ही वदवून घेतील असा पूर्ण विश्वास होता आणि काल तसेच घडले त्यामुळे आम्ही समाधानी असल्याची भावना बच्चू कडू यांचे दुसरे ज्येष्ठ बंधू बाळू कडू यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान नागपूरतील तीन दिवसांच्या आंदोलनामुळे नागपूरकरांना झालेल्या त्रासाबद्दल दोन्ही भावांनी नागपूरकरणची माफी ही मागितली आहे सोबतच अनेक नागपूरकरांनी आलेल्या शेकडो आंदोलन आणि शेतकऱ्यांना केलेल्या मदती संदर्भात नागपूरकरांचे आभारही मानले आहे.
Bachchu Kadu : बच्चू कडू आंदोलन मागे घेणार का?
या निर्णयानंतर बच्चू कडू आंदोलन मागे घेणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर बोलताना कडूब म्हणाले. बाकीच्या सर्व नेत्यांशी चर्चा करुन आम्ही याबबतचा निर्णय घेऊ असे कडू म्हणाले. या आंदोलनाचा मी जरी चेहरा असलो तरी या आंदोलनात राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले, रविकांत तुपकर, वामनराव चटप यांचे योगदान असल्याचे कडू महणाले. मी यातील एक लहान कार्यकर्ता आहे. शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे. शेतकरी नेते मोठ्या मनानं या आंदोलनात सहभागी झाले आहेत असे कडू म्हणाले. आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की, तूर्तास तरी आंदोलनाचा गरज नाही. आम्हाला जर गोल गोल फिरवलं तर आम्ही एवढं खुळं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला. अनेक लहान मोठ्या संघटनांनी, मनोज जरांगे पाटलांनी पाठिंबा दिला होता, त्यांचे सर्वाचे आभार, सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे आभार असे कडू म्हणाले.
आणखी वाचा
 
			 
											
Comments are closed.