नाशिकमधील IVF सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय

नाशिक न्यूज : राज्याला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणाचे (Badlapur Uterine Eggs Selling Racket) नाशिक कनेक्शन पुन्हा चर्चेत आले आहे. स्त्री बीज प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी कारवाई करत या संदर्भात मोठा खुलासा केला आहे. नाशिकच्या मालती आयव्हीएफ (IVF) सेंटरमधून (Malti IVF Center) वर्षभरात 96 महिलांचे बीज खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. नाशिक महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या कागदपत्र तपासणीत हि माहिती उघडकीस झाली आहे. तर मालतीआयव्हीएफ सेन्टरच्या प्रमाणपत्रच्या आधारावर बदलापूरमध्ये बेकायदेशीर आयव्हीएफसेन्टर सुरू होतं, असाही आता समोर आलं आहे. (नाशिक क्राईम न्यूज)

मिळलेल्या माहितीनुसार, नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने या आधीf मालती आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द केलीहे. सोबतच संबंधित केंद्र सील करण्यात आले आहे. तर महत्त्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी मालती आयव्हीएफ सेंटरचा संचालक डॉ. अमोल पाटील याला बदलापूर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डॉ. पाटीलवर सरोगेट मदर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप आहे.

Nashik Crime News : एकाच महिलेचे स्त्री बीज एकापेक्षा जास्त वेळा काढले?

दरम्यानडॉ.अमोल पाटील सध्या बदलापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. गृह विभाग आणि आरोग्य विभाग दोघांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. अशातच या प्रकरणाच्या तपासात एकाच महिलेचे स्त्री बीज एकापेक्षा जास्त वेळा काढण्यात आले का? याचा देखील आता तपास केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय? (Badlapur Uterine Eggs Selling Racket)

बदलापूरात स्त्री बीजाच्या अवैध विक्रीचं रॅकेट उघड झालं आहे. याप्रकारचं हे भीषण रॅकेट चक्क एका घरातून चालवलं जात होतं. सुलक्षणा गाडेकर या महिलेनं घरामध्ये स्त्री बीज वाढवणारी इंजेक्शन्स बेकायदेशीरपणे साठवून ठेवली होती, असा आरोप आहे. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून हे इंजेक्शन दिलं जात होतं. त्यानंतर गर्भाशयात स्त्री बीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना IVF सेंटरमध्ये पाठवलं जात होतं. तिथल्या डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्री बीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकानं सुलक्षणा गाडेकर यांच्या घरी धाड टाकून हे रॅकेट उघडकीस आणलं. या प्रकरणी गाडेकर यांच्यासह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे एक मोठं इंटरनॅशनल रॅकेट असण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.