धनुभाऊंनी भर सभेत वाल्मिक कराडची आठवण काढली, आता बजरंग सोनवणेंनी मुंडेंना डिवचलं; म्हणाले, ‘लई


धनंजय मुंडेंवर बजरंग सोनवणे : परळीतील प्रचारसभेत माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराडची (Walmik Karad) आठवण काढल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “आज एक व्यक्ती आपल्या सोबत नाही, याची जाणीव होते,” असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. आता बीडचे (Beed) खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी यावरून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

आमदार धनंजय मुंडे यांनी काल भाषणात नाव न घेता वाल्मिक कराडची आठवण काढली होती. याबाबत बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लई आठवण येत असली तर भेटायला मधी जा, असे म्हणत बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. बजरंग सोनवणे पुढे म्हणाले की, परळीमध्ये दादागिरी, दहशत, भ्रष्टाचाराला हटवायचे आहे. परळीमधल्या दहशतीला हद्दपार करायचे आहे. यासाठी मी परळीत ठाण मांडून आहे. मी जनतेसमोर जाऊन आशीर्वाद मागत आहे.

Bajrang Sonwane: 1 लाख 40 हजार मतांनी निवडून आल्याचे सांगतात, पण…

परळीची निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला लोकांना स्वतःचं मतदान करता आलं नाही. काही जण 1 लाख 40 हजार मतांनी निवडून आल्याचे सांगतात, त्याच्यातही बोगस मतं आहेत. त्यावेळेस यंत्रणा तुमच्या बाजूने होत्या. आता मी खासदार असल्याने माझ्याही बाजूने पोलिसांना उभं राहावं लागेल. निवडणूक निर्णय अधिकारी दुजाभाव करत आहेत, असा हल्लाबोल देखील बजरंग सोनवणे यांनी केलाय.

Dhananjay Munde on Walmik Karad: काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

धनंजय मुंडे म्हणाले होते की, “जगमित्र कार्यालयातून गोरगरिबांची सेवा करत आलो, गेल्या नऊ-दहा महिन्यांपासून हे कार्यालय सुरू आहे, काम सुरू आहे. पण आज एक व्यक्ती आपल्यासोबत नाही, याची जाणीवही होते. काय चुकले, काय नाही, ते न्यायालय बघेल, पण ती जाणीव नक्कीच आहे, असे त्यांनी म्हटले होते.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Deshmukh : निवडणुकीच्या काळात मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण, धनंजय देशमुखांचा हल्लाबोल, चुकीची कामं बंद झाल्यामुळे….

Manoj Jarange Patil on Dhananjay Munde: …तर धन्याइतका नीच माणूस पृथ्वीतलावर असूच शकत नाही; वाल्मिक कराडची आठवण काढताच धनंजय मुंडेंवर जरांगेंची बोचरी टीका

आणखी वाचा

Comments are closed.