बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढच्या आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद

बँक हॉलिडे अलर्ट: जर तुम्ही येत्या आठवड्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे ठरवत असाल, तर आधी सुट्टीची यादी तपासणे गरजेचं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) संपूर्ण वर्षाच्या बँक सुट्ट्यांची यादी आदीच जाहीर करते. यामध्ये बँका कोणत्या दिवशी आणि कोणत्या शहरांसाठी बंद आहेत आणि का बंद आहेत हे स्पष्टपणे सांगितले आहे. पूर्व माहितीशिवाय बँकेच्या शाखेत भेट दिल्याने मौल्यवान वेळ वाया जाऊ शकतो आणि गैरसोय होऊ शकते. जर तुम्ही येत्या आठवड्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे ठरवत असाल, तर आधी सुट्ट्यांची यादी तपासणे गरजेचे आहे. कारण, पुढच्या आठवड्यात बँका बंज राहणार आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

पुढील आठवड्यात बँका चार दिवस बंद राहणार आहेत. जर तुम्ही कोणत्याही व्यवहारासाठी, चेक क्लिअरन्ससाठी किंवा इतर कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर या सुट्ट्यांचा विचार करा. दरम्यान, बँकांचे व्यवहार करण्याच्या आधी तुम्ही सविस्तर वेळापत्रक पाहणं गरजेचं आहे.

18 आणि 19 फेब्रुवारी रोजी या राज्यांमध्ये बँका राहणार बंद

जर तुम्ही 18 किंवा 19 फेब्रुवारी रोजी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर प्रथम हे जाणून घ्या की या सुट्ट्या संपूर्ण देशात नव्हे तर निवडक राज्यांमध्ये असतील. 18 फेब्रुवारी रोजी फक्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील, जिथे लोसार सणामुळे शाखा बंद राहतील, तर इतर राज्यांमध्ये सामान्य कामकाज सुरू राहील.

दुसऱ्या दिवशी, 19 फेब्रुवारी रोजी, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रात बँका बंद राहतील. तथापि, देशाच्या इतर भागात बँका खुल्या राहतील. म्हणून, जर तुम्ही या राज्यांमध्ये राहत असाल तर तुम्ही या दिवशी बँकेत जाणे टाळावे.

20 आणि 22 फेब्रुवारी रोजी बँका कुठे बंद राहतील?

या आठवड्याच्या अखेरीस काही राज्यांमध्ये बँकिंग सेवांवर परिणाम होईल. अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममध्ये 20 फेब्रुवारी रोजी राज्य स्थापना दिनानिमित्त बँका बंद राहतील. तथापि, देशातील उर्वरित भागात कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील.

22  फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने, देशभरातील सर्व बँक शाखा बंद राहतील. त्यामुळे, जर तुम्हाला या तारखांना बँकिंगशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर ते आधीच पूर्ण करणे चांगले.

महत्वाच्या बातम्या:

बँकांमध्ये व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात ‘या’ दिवशा बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती

आणखी वाचा

Comments are closed.