फेब्रुवारीत बँका किती दिवस बंद राहणार? आरबीआयनं बँकांना किती दिवस सुट्टी दिली ? संपूर्ण यादी
बँक सुट्ट्या फेब्रुवारी 2026 नवी दिल्ली: फेब्रुवारी महिन्यात तुम्ही कोणत्याही कारणानं बँकेत जाण्याचं नियोजन करत असाल तर तुम्हाला या महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं फेब्रुवारी महिन्यातील बँकांना किती दिवस सुट्टी असेल याची यादी जाहीर केली आहे. यात साप्ताहिक सुट्टी, दुसरा आणि चौथा शनिवार यासह राज्यातील स्थानिक सणांमुळं असलेल्या सुट्ट्यांचा समावेश आहे.
फेब्रुवारीत किती दिवस बँका बंद असणार?
फेब्रुवारी महिन्यात देशभर काही दिवस बँका बंद राहतील. रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार या दिवशी बँकांना साप्ताहिक सुट्टी असते. यामुळं या दिवशी बँका सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशात बंद राहतील.
1 फेब्रुवारी (रविवार): साप्ताहिक सुट्टी
14 फेब्रुवारी (शनिवार): दुसरा शनिवार
15 फेब्रुवारी(रविवार): साप्ताहिक सुट्टी
22 फेब्रुवारी (रविवार): साप्ताहिक सुट्टी
28 फेब्रुवारी(शनिवार): चौथा शनिवार
विविध राज्यात स्थानिक सणांमुळं देखील सुट्टी जाहीर केली जाते. फेब्रुवारीत महाशिवरात्री15 तारखेला आहे. या दिवशी रविवार आहे. त्यामुळं या सणानिमित्त असलेली सुट्टी आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्लीसह सर्व राज्यांना लागू असेल. याशिवाय काही राज्यांमध्ये स्थानिक सणांमुळं सुट्टी असेल.
18 फेब्रुवारी : सिक्किममध्ये लोसार
19 फेब्रुवारी : महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती
20 फेब्रुवारी: अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम राज्य स्थापना दिवस
बँका बंद असल्या तरी कोणत्या सेवा मिळणार
बँकांच्या शाखा बंद असल्या तरी ऑनलाईन बँकिंगमुळं ग्राहकांना फार त्रास होणार नाही. यूपीआय, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग सेवा सुरु राहतील. एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सुरु असेल. मात्र, चेक क्लिअरन्स, ड्राफ्ट, लॉक संदर्भातील कामं याशिवाय ज्याकामांसाठी प्रत्यक्ष बँकेत जावं लागतं, अशी कामं सुट्टीच्या दिवसी होणार नाहीत. यामुळं बँक ग्राहकांनी बँकांमधील कामं सुट्टीचं वेळापत्रक पाहून करणं अपेक्षित आहे.
आणखी वाचा
Comments are closed.