बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट
पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती एबीपी माझाला दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून बारामतीत विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजच्या संलग्न रुग्णालयाला अजित पवारांचे नाव दिल्याने काही प्रमाणात धनगर समाज नाराज झाला आहे. त्यामुळे नाराज झालेंल्या पैकी कुणीतरी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळं बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर आहे.
बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजच्या संलग्न रुग्णालयाला अजित पवारांचे नाव दिल्याने काही प्रमाणात धनगर समाज नाराज झाला आहे.त्यामुळे नाराज झालेल्या पैकी कुणीतरी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष निवडणूक लढणार नसला तरी बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची निवडणूक न लढवण्याची भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष बारामती पोटनिवडणूक लढणार नाही. पक्षांतर्गत बैठकीत निवडणूक न लढण्याचा निर्णय झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्यात विरोधात युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा निवडणूक लढवली होती. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार न देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका आहे.
दरम्यान, राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्राजक्त तनपुरे हे इच्छुक आहेत. तिथं देखील निवडणूक होण्याची शक्यता आहे.
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी : 30 मार्च 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026
आणखी वाचा
Comments are closed.