सुनेत्रा पवारांविरुद्ध शड्डू ठोकला, आता शरद पवारांनाही भेटणार; बारामतीमधील काँग्रेसचे उमेदवार आ
Akash More Meet Sharad Pawar Baramati By Election 2026: राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Baramati By Election 2026) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेसने माघार न घेण्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे आता बारामतीत निवडणूक होणे जवळपास निश्चित आहे. त्या व्यतिरिक्त करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांच्यासह एकूण 53 उमेदवारांपैकी काल 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे अजून 47 उमेदवार रिंगणात आहेत. आता आज शेवटच्या दिवशी माघारीच्या सत्रात घडते हे पहाणं महत्वाचं आहे. याचदरम्यान, बारामतीमधील एक महत्वाची घडामोडी समोर आली आहे. (Sunetra Pawar Baramati By Election 2026)
बारामतीमधील काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे शरद पवार यांची भेट (Akash More Meet Sharad Pawar) घेणार आहेत. थोड्याच वेळात आकाश मोरे शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी येणार आहेत. शरद पवारांनी पाठींबा द्यावा, अशी मागणी काँगेस उमेदवार करणार का?, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे आकाश मोरे आणि शरद पवारांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांना फोन- (Sunetra Pawar And Harshwardhan Sapkal)
बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. बारामतीत काँग्रेस माघार घेणार का याकडे लक्ष लागलंय. काल सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. दोन्ही नेत्यांमध्ये यावर चर्चा झाली आहे. परंतु, बारामतीची पोटनिवडणूक लढवावी हा निर्णय दिल्लीतून घेतला गेला आहे. त्यामुळे उमेदवारी मागे घेताना हाय कमांडशी चर्चा करावी लागेल, त्यांचा सल्ला घ्यावा लागेल असं काँग्रेसने म्हटलं असल्याची माहिती आहे. आधीही सुनेत्रा पवार यांनीहर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलंय. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे.
कोण आहेत आकाश मोरे? (Who Is Akash More Baramati Candidate?)
आकाश मोरे हे काँग्रेसच्या विचारधारेने प्रेरित असून ते बारामती (पुणे जिल्हा) परिसरात सक्रिय आहेत. ते माजी आमदार विजयराव मोरे यांचे सुपुत्र आहेत. आकाश मोरे पेशाने वकील (Advocate) आहेत. त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले असून ते विविध सामाजिक आणि कायदेशीर प्रश्नांवर काम करतात. आकाश मोरेंनी त्यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
बारामती विधानसभेसाठी 23 एप्रिलला मतदान- (Baramati By Election 2026)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.