सुनेत्रा पवारांच्या ‘त्या’ फोन कॉलने चक्रं फिरली? हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा अचानक रद्द,
Sunetra Pawar Baramati byelection 2026: महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा भाग राहिलेल्या बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरलेल्या शेवटच्या काही तासांमध्ये रंजक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. काँग्रेस पक्षाने रविवारी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आकाश मोरे (Akash More) यांचे नाव जाहीर केले होते. दिल्लीतून ही घोषणा होण्यापूर्वी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांना फोन करुन बारामती पोटनिवडणुकीत (Baramati Election 2026) पाठिंबा देण्याची विनंती केल्याची चर्चा होती. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने सुनेत्रा पवार यांचा शिष्टाईचा प्रयत्न वाया गेल्याचे बोलले जात होते. मात्र, सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी आता बारामती पोटनिवडणुकीच्या राजकारणात ट्विस्ट येताना दिसत आहे.
काँग्रेसने सुरुवातीपासूनच बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसच्या उमेदवारीचा पोटनिवडणुकीसाठीची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बारामतीमध्ये येणार, हे जवळपास निश्चित होते. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे हे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ याठिकाणी येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, सोमवारी सकाळी अचानक हर्षवर्धन सपकाळ यांचा बारामती दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना केरळ विधानसभेच्या प्रचाराला जायचे असल्याने त्यांचा बारामती दौरा रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हर्षवर्धन सपकाळ यांचा बारामती दौरा रद्द झाल्यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यांचे बारामतीमध्ये न येणे, याकडे आश्चर्याने पाहिले जाईल. यामागे सुनेत्रा पवार यांनी काल केलेल्या फोन कॉल कारणीभूत आहे का, अशीही चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसचे आकाश मोरे हे बारामती पोटनिवडणुकीसाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्हा पातळीवरचे नेते असतील, असे सांगितले जात आहे.
तर दुसरीकडे बारामती पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा विचारही बदलल्याची चर्चा आहे. लक्ष्मण हाके हे सोमवारी बारामतीमध्ये पोहोचले. मात्र, त्यांनी माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे आणि धनंजय मुंडे हे लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी पोहोचले. या दोघांनी लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करुन सुनेत्रा पवार यांच्यासाठी माघार घेण्याची विनंती केली. त्यामुळे लक्ष्मण हाके हेदेखील बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतील, अशी शक्यता आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.