कोणाची दहशत खपवून घेणार नाही, लाईन मारायला गेला तर टायरमध्ये…; ‘ती’ घटना सांगत अजित पवारांनी
पुणे : बारामतीमध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी रोड रोमियोंना आणि टवाळखोरांना सज्जड दम दिला आहे. कोणी कुठे तरी लाईन मारायला जाल. तुझी लाईनच काढतो आणि टायराखाली घेतो अशा शब्दात त्यांनी दम दिला. कोणाची दहशत खपवून घेणार नाही, कुणालाही अजिबात सोडणार नाही असं ही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे वेळीच शहाणे व्हा, कायदा हातात घेऊ नका. बाबासाहेबांनी संविधान आणि कायदा समाजाच्या भल्यासाठी दिला आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
राजकीय पक्षाचा असला तरी गुंडगिरी खपवून घेवू नका
बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरून अजित पवार यांनी कडक भूमिका घेतली आहे. बाहेरून आलेल्या लोकांकडून होणारे गुन्हे आणि टवाळक्या केल्याने बारामतीची बदनामी होत आहे. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले, उत्तर प्रदेश आणि बिहार मधून कामासाठी लोक येतात. मात्र, एकाने आठ वर्षांच्या मुलीवर तीही उत्तर प्रदेशची असताना अत्याचार केला. शेवटी बदनामी बारामतीची होते. अशा गुन्हेगारांना अजिबात सोडू नका. त्यांचा पोलिसांनी कायमचा बंदोबस्त करावा. तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असला तरी गुंडगिरी खपवून घेवू नका. बारामतीती टवाळक्या करणाऱ्या तरुणांना अजित पवार यांनी सुनावले आहे. “कुणी कुठेतरी लाइन मारायला गेला तर तुझी लाइनच काढतो आणि टायरखाली घेतो. कुणालाही सोडणार नाही. प्रत्येकाने कायदा हातात घेऊ नये,” असा सज्जड दम अजित पवार यांनी भरला आहे. कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहावी. त्यात कोणाची दादागिरी गुंडगिरी असता कामा नये, सर्वांनी शिस्तीचे पालन करावं असंही ते म्हणालेत.
कठोर निर्णय घ्यावे लागतात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमधील विकासकामांवर भाष्य करताना कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. “विकासाच्या कामांदरम्यान काही ठिकाणी मला अतिक्रमणे काढावी लागतात. मात्र, कोणाच्या पोटावर पाय द्यावा, अशी माझी भावना नाही. त्यांना पर्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे ते म्हणाले.यावेळी त्यांनी अलीकडील एका अपघाताचा उल्लेख केला. “परवा दिवशी एक लाईटचा खांब पडला. सुदैवाने एक बहीण वाचली. पण उद्या लोक म्हणतील बोगस काम चाललं आहे. खरं तर त्या हरामखोरांनी नट-बोल्टच काढून नेला होता. मी आता स्पष्ट सांगितलंय, असले सापडले तर त्यांच्यावर मकोका लावा. त्या साल्यांना सोडू नका,” असा इशारा अजित पवार यांनी दिला. त्यांच्या या भाषणातील स्पष्टवक्तेपणा आणि कठोर शब्द सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.