फक्त 2 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू तरुणांचं भविष्य ठरवणार! BCCI ने सोपवली मोठी जबाबदारी
BCCI ने काही दिवसांपूर्वी मुख्य निवड समितीचे अध्यक्ष म्हणून प्रज्ञान ओझाची निवड केली तर रमेश पोवारचा समितीमध्ये समावेश केला आहे. BCCI ने आता जुनियर निवड समिती जाहीर केली असून, हिंदुस्थानचा माजी वेगवान गोलंदाज परविंदर अवाना याची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
परविंदर अवाना याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने फक्त 2 सामन्यांमध्ये देशाच प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा खेळ दमदार राहिला आहे. दिल्लीकडून खेळताना 62 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 191 विकेट्स त्याने घेतल्या आहेत. याशिवाय, IPL मध्ये पंजाब किंग्सचे प्रतिनिधित्व करताना त्याने 33 सामन्यांमध्ये 93 विकेट्स घेतल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने प्रशिक्षक म्हणून आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.
अवाना यांनी दिल्लीच्या अंडर-16, अंडर-19 आणि अंडर-23 संघांचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. तसेच, ते हिंदुस्थानच्या अंडर-19 संघ आणि बीसीसीआयच्या विविध कार्यक्रमांशी जोडले गेलेले असून, या अनुभवाचा फायदा त्यांना नवीन जुनियर निवड समितीचे अध्यक्ष म्हणून युवा प्रतिभा शोधण्यासाठी होईल. अवाना यांच्यासह या समितीमध्ये कृष्णा दास, राकेश पटेल आणि एन. अर्जुन यादव या तीन अन्य सदस्यांचा समावेश करण्यात आला असून, पाचव्या सदस्याची घोषणा लवकरच केली जाईल.
Comments are closed.