कोण IN अन् कोण OUT…? आयर्लंड, इंग्लंड अन् आशियाई क्रीडा स्पर्धासाठी BCCI ‘या’ दिवशी करणार भार

टीम इंडिया टी-20 स्क्वॉड अपडेट मराठीत: भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा पुढील टी-20 कार्यक्रम अत्यंत व्यस्त असणार असून आयर्लंड दौरा, इंग्लंडविरुद्धची मालिका आणि आशियाई क्रीडा स्पर्धासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होणार आहे. या तिन्ही स्पर्धांसाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) 6 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन आयर्लंड दौरा, इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका आणि आशियाई क्रीडा स्पर्धासाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर यांच्यासोबत बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया उपस्थित राहणार आहेत.

कधी आणि कुठे होणार पत्रकार परिषद? (Team India T20 Squad Update)

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या मुख्यालयात दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद सुरू होईल. या परिषदेत आगामी मालिकांसाठीची संघरचना जाहीर केली जाईल. संघ निवडीत काही मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टी-20 संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे? (Shreyas Iyer as India’s new T20 captain)

भारतीय टी-20 संघाच्या नेतृत्वात मोठा बदल होण्याची चर्चा रंगली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरला टी-20 संघाचा नवा कर्णधार बनवले जाऊ शकते. गेल्या काही महिन्यांतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अय्यरचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. तसेच युवा फलंदाज तिलक वर्माला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. मात्र, कर्णधारपद गमावणाऱ्या सूर्यकुमार यादवला अंतिम संघात स्थान मिळेल की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाकडे सर्वांचे लक्ष (Vaibhav Sooryavanshi set for debut)

अवघ्या 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला भारतीय टी-20 संघात संधी मिळण्याची जोरदार चर्चा आहे. आयपीएल 2026 मध्ये त्याने केलेल्या दमदार फलंदाजीमुळे निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वैभवला संघात स्थान मिळाल्यास त्याचे भारतीय संघासाठी पदार्पण होऊ शकते. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याच्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

आयपीएल 2026 मध्ये वैभवची ऐतिहासिक कामगिरी (Vaibhav Sooryavanshi IPL 2026)

आयपीएल 2026 हंगामात वैभव सूर्यवंशीने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने 16 डावांमध्ये 48.50 च्या सरासरीने तब्बल 776 धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने ऑरेंज कॅप जिंकली. विशेष म्हणजे, आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप जिंकणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला. याशिवाय हंगामभरातील उत्कृष्ट प्रदर्शनासाठी त्याला अनेक वैयक्तिक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले. आता श्रेयस अय्यरच्या संभाव्य कर्णधारपदापासून ते वैभव सूर्यवंशीच्या संभाव्य पदार्पणापर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरे उद्याच्या पत्रकार परिषदेत मिळण्याची अपेक्षा आहे.

हे ही वाचा –

India T20 Captain Update : विश्वचषक जिंकणाऱ्या सूर्याचा गेम ओव्हर; तर डिसेंबर 2023 पासून संघातून बाहेर असलेला खेळाडू थेट कॅप्टन म्हणून परतणार; वैभव सूर्यवंशीचीही एन्ट्री?

Comments are closed.