वैभव सूर्यवंशीसारखी गोल्डन संधी इतरांना नाहीच… नवख्या खेळाडूंना आयपीएल खेळण्यासाठी करावे लागण
बीसीसीआय तरुण खेळाडूंसाठी नवीन नियम आयपीएल 2026 साठी सेट करते: वयाच्या 14 व्या वर्षी वैभव सूर्यवंशीने क्रिकेट विश्वात नावलौकीक मिळवला आहे. त्याच्या तूफानी खेळीमुळे त्याच्या नावाची चर्चा आता क्रिकेट विश्वात होत आहे. यंदाच्या आयपीएल 2025 मध्ये त्याने छाप सोडली, तेव्हापासून भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आहे. मात्र, आता वैभव सूर्यवंशीसारखी गोल्डन संधी इतरांना घेता येणार नाही, कारण बीसीसीआयने नवा नियम लागू केला आहे.
नवा नियम काय आहे? (BCCI introduces new rule for under-16 IPL players)
बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार देश-विदेशातील अंडर-16 खेळाडूंना थेट आयपीएलमध्ये प्रवेश मिळणार नाही. आयपीएल खेळण्यासाठी त्यांच्याकडे किमान एक तरी फर्स्ट क्लास सामन्याचा अनुभव असणे बंधनकारक केले आहे. फर्स्ट क्लास क्रिकेट न खेळता कोणत्याही खेळाडूस आयपीएलमध्ये उतरता येणार नाही.
नियमाला मंजुरी
28 सप्टेंबर रोजी झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) या नियमावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हा नियम आयपीएल 2026 पासून लागू होणार आहे. यापूर्वी अशी कोणतीही अट नव्हती. खेळाडू त्यांच्या कामगिरीच्या जोरावर थेट ऑक्शनमध्ये जाऊ शकत होते आणि फ्रँचायझी त्यांना साइन करू शकत होती.
BC बीसीसीआयचा नवीन नियम 🚨
– आयपीएलमध्ये खेळण्यास पात्र होण्यासाठी, यू 16 खेळाडूने किमान एक प्रथम श्रेणी सामना खेळला असावा. [Gaurav Gupta] pic.twitter.com/mfubqm7c0m
– जॉन्स. (@Criccrazyjhons) 28 सप्टेंबर, 2025
वैभव सूर्यवंशी खेळणार का पुढील हंगामात? (Vaibhav Suryavanshi IPL News)
राजस्थान रॉयल्सकडून अवघ्या 14 वर्षे 23 दिवसांच्या वयात आयपीएल पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी पुढील हंगामात खेळू शकेल का, हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याचे उत्तर ‘होय’ असेच आहे. कारण वैभव सूर्यवंशीने आधीच बिहारकडून रणजी ट्रॉफीत मुंबईविरुद्ध 2024 मध्ये पदार्पण केले आहे. तो पाच फर्स्ट क्लास सामने खेळला आहे.
बीसीसीआयचा घरेलू क्रिकेटचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न
बीसीसीआयचा हा निर्णय घरगुती क्रिकेट अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे. फ्रँचायझी क्रिकेटच्या झगमगाटात जाण्याआधी खेळाडूंनी दीर्घ प्रारूपातील क्रिकेटमधून आपले कौशल्य विकसित करावे, हा उद्देश या नियमामागे आहे. या नव्या धोरणामुळे रणजी ट्रॉफी आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळाडूंचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मिथुन मन्हास यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड (Mithun Manhas BCCI President 2025)
भारताच्या घरेलू क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांपैकी एक राहिलेले मिथुन मन्हास यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग (Jitendra Singh congratulates Mithun Manhas) यांनी रविवारी याची घोषणा केली. विशेष म्हणजे, मिथुन मन्हास हे असे पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले आहेत. ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही, तरीही त्यांना बीसीसीआय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी यांनीही अध्यक्षपद भूषवले होते आणि ते दोघेही दीर्घकाळ टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले होते. पण मन्हास यांचा प्रवास वेगळा आहे
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.