बांगलादेशची बंडखोरी महागात पडणार! ICC च्या कारवाईनंतर BCCI ने उचललं मोठं पाऊल, भारत दौरा रद्द

बीसीसीआय आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड: बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) टी-20 वर्ल्डकप 2026 साठी भारतात येण्यास नकार दिल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेशला थेट या स्पर्धेतूनच बाहेर काढले. बीसीबीच्या या भूमिकेमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देखील नाराज असल्याचे दिसून येत आहे.

बीसीसीआयचा काउंटर अटॅक

आयसीसीनंतर आता बीसीसीआयनेही बांगलादेश क्रिकेट बोर्डाविरोधात कठोर पाऊल उचलण्याची तयारी दर्शवली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा बांगलादेश दौरा रद्द करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. भारताचा संघ आधी ऑगस्ट 2025 मध्ये बांगलादेश दौऱ्यावर जाणार होता, जिथे टी-20 आणि वनडे मालिका खेळवण्यात येणार होती. मात्र, सुरक्षेच्या कारणांमुळे हा दौरा सप्टेंबर 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. आता दोन्ही बोर्डांमधील संबंध अधिकच बिघडल्याने सप्टेंबर 2026 मध्येही हा दौरा होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

बीसीबीला बसू शकतो कोट्यवधींचा फटका

जर बीसीसीआयने बांगलादेश दौरा रद्द केला, तर त्याचा थेट आर्थिक फटका बीसीबीला बसणार आहे. भारताविरुद्धची मालिका रद्द झाल्यास बांगलादेश क्रिकेट बोर्डाला कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागेल. त्याचबरोबर आयसीसीही बांग्लादेशविरोधात आणखी कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

अडचणीत बांगलादेश क्रिकेट बोर्ड

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये न खेळण्याचा निर्णय बीसीबीसाठी घातक ठरू शकतो. जर आयसीसीने निधी देण्यास नकार दिला, तर बांगलादेशसाठी आपली क्रिकेट व्यवस्था चालवणेही कठीण होईल. याशिवाय भारतासारख्या मोठ्या संघाविरुद्ध मालिका न खेळल्यास इतर देशही बांगलादेश दौऱ्याबाबत सावध भूमिका घेऊ शकतात. सध्याची परिस्थिती पाहता, बांगलादेश क्रिकेट बोर्डासमोर क्रिकेट टिकवणे हेच सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.

बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला संधी

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार आयसीसीनं अधिकृतपणे टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये स्कॉटलंडला स्थान दिलं आहे. ते आता बांगलादेशच्या जागी क गटात खेळतील. स्कॉटलंडचे तीन सामने कोलकाता येथील ईडन गार्डन्समध्ये होतील. तर, एका सामना मुंबईत होणार आहे. स्कॉटलंडला वेस्ट इंडिज, इटली आणि इंग्लंड विरुद्ध कोलकाता येथे खेळावं लागेल. तर, 17 फेब्रुवारीला मुंबईत त्यांचा सामना नेपाळ सोबत होईल. आयसीसीनं बांगलादेश क्रिकेट बोर्डाला त्यांचा निर्णय कळवण्यासाठी 24 तासांचा वेळ दिला होता. बांगलादेश क्रिकेट बोर्डानं बांगलादेश सरकारनं भारतात सामने न खेळण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. यानंतर आयसीसीनं स्कॉटलंडला संधी दिली आहे.

हे ही वाचा  –

Palash Muchchal: स्मृती मंधानाला फसवलं, 40 लाखांचा फ्रॉड… आरोपांनंतर पलाश मुच्छलने मराठी अभिनेत्यावर ठोकला 10 कोटींचा मानहानीचा दावा

आणखी वाचा

Comments are closed.