गड्यानो फोटो काढताना लक्ष ठेवा! वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबतच्या फोटोवरून अजित पवारांचा
बारामती: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हत्या प्रकरणी नवीन खुलासे समोर येत आहेत, तर आरोपींसोबत संबंध असलेल्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.या प्रकरणातील सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराडला लक्ष्य केलं जात असून त्याच्यासोबत चांगले संबंध असलेल्या धनंजय मुंडेंनाही (Dhananjay Munde) लक्ष्य केले जात आहे. अनेक नेत्यांनी मंत्र्यांनी धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप केले आहेत. तर सर्वत्र धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह वाल्मिक कराडचे (Walmik Karad) फोटो असल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मोठं भाष्य केलं आहे.
अजित पवार (Ajit Pawar) हे पणदरे येथील नर्मदा किसन ऍग्रो उद्घाटनप्रसंगी बोलताना म्हणाले, अलीकडे गर्दी वाढत आहे, सगळ्यांना आमच्या सोबत फोटो काढायचा असतो, पण फोटो नाय काढून दिला तरी नाराज होतात, आणि गडी बदलला असं म्हणतात,आणि अशातच एखादा नवीन गडी येतो फोटो काढून जातो आणि वाटच लागते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढताय याची आम्हाला कल्पना कार्यकर्त्यांनी द्यावी, असा सल्ला देखील अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांना दिला आहे.
कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरून दादांचा सल्ला
वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती दौऱ्यात एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. गड्यांनो, आमच्यासोबत कोण फोटो घेतोय याची काळजी घ्या, असे आवाहन देखील अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. अजित पवार (Ajit Pawar) बोलताना म्हणाले, आपले फोटो कार्यक्रमात कोणासोबतही काढले जातात. परंतु, काही वेळा याची किंमत मोजावी लागते. अलीकडे गर्दी वाढत आहे. सगळ्यांना आमच्यासोबत फोटो काढायचा असतो. पण, फोटो नाही काढू दिला, तर नाराजी होते अन् गडी बदलला, असे म्हणतात. अशातच एखादा नवीन गडी येतो, फोटो काढून जातो आणि पुढे वाटच लागते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढतोय, याची आम्हाला कल्पना द्यावी, असं म्हणत स्पष्ट शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना माहिती देण्याचं आवाहन केलंय.
दोन नंबरवाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना…
अजित पवार (Ajit Pawar) यांनी वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटो प्रकरणावरून भाष्य केलं आहे. सध्या राजकारण काय चाललंय ते पाहा. सगळ्या मंत्र्यांबरोबर या गड्याचा फोटो. सगळं आकरीतच घडत आहे. त्यामुळे यदाकदाचित कोणा चुकीच्या माणसाचा फोटो माझ्यासोबत काढला, तर ते मला माहिती नव्हतं, तो चुकून काढला आहे, असे मी सांगेन. मी पोलिसांनाही सांगितले आहे की, कार्यक्रमात असे कोणी फोटो काढत असतील, त्यावर लक्ष द्या. दोन नंबरवाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना आमच्यापासून लांब ठेवा, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.