बीडमध्ये भीषण अपघात! भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर
बीड अपघात बातम्या: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Dhule-Solapur National Highway) बीडजवळील नामलगाव फाटा (Namalgaon Phata) येथील उड्डाणपुलाजवळ आज सकाळी आठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात (Accident) चार जणांचा जागीच मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. (Beed Accident News)
अपघात एवढा भीषण होता की, भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने सहा पादचाऱ्यांना चिरडले. हे सर्वजण पेंडगाव येथे देवदर्शनासाठी निघाले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर परिसरात घबराट आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. मृत व जखमींची नावे अद्याप स्पष्ट झाली नसून, पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान, अपघात नामलगाव फाटा उड्डाणपुलाजवळ झाला.
कंटेनर चालक पोलिसांच्या ताब्यात
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच गढी उड्डाणपुलाजवळ अशाच पद्धतीने एका कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या भरधाव वेगावर आळा घालण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, कंटेनरचा चालक ताब्यात घेण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.