Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
वर्षभरापूर्वी बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं… त्यानंतर जिल्ह्याला शिस्त लावण्याची घोषणा करत तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचं पालकत्व स्वतःकडे घेतलं.. अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवारांकडे बीडचं पालकमंत्रीपदही आलं… पण पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी बीडच्या गेवराईमध्ये केलेलं एक विधान सध्या चर्चेत आहे… गेवराई नगर परिषदेच्या विविध विकासकामांचा प्रारंभ पंकजाताईंच्या हस्ते झाला… यावेळी सुनेत्रावहिनी पालकमंत्री असल्या, तरी बीडची पालक मी आहे, असं म्हणत त्यांनी गेवराईचं पालकत्व स्वीकारत असल्याचं जाहीर केलं… एवढंच नव्हे, तर त्यांनी गुरुवारी बीडमध्ये जनता दरबारही घेतला… पंकजा मुंडेंनी पालकत्वाबाबत केलेल्या विधानावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजप आणि राष्ट्रवादीला चिमटे काढलेत… आता पंकजा मुंडेंचं हे पालकत्व सुनेत्रा पवार प्रेमाने नजरेआड करणार की या दाव्यावर डोळे वटारणार, हे लवकरच कळेल.
Comments are closed.