2026 फिफा वर्ल्ड कप फायनल 19 की 20 जुलैला? भारतात सामना पाहणाऱ्यांसाठी मोठी अपडेट
फिफा वर्ल्ड कप 2026 (FIFA World Cup 2026) चे दोन अंतिम (फायनलिस्ट) संघ निश्चित झाले आहेत. जेतेपदासाठीचा हा महामुकाबला 16 वर्षांनंतर फायनलमध्ये पोहोचलेला स्पेन आणि गतविजेता (डिफेंडिंग चॅम्पियन) अर्जेंटिना यांच्यात खेळवला जाईल. मात्र, हा अंतिम सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. भारतामधील फुटबॉल चाहते फायनलच्या वेळेबाबत प्रचंड गोंधळात पडल्याचे दिसून येत आहे. भारतात चाहत्यांना हा फायनल सामना 19 जुलैला की 20 जुलैला पाहायला मिळणार?
स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यातील हा अंतिम सामना न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियम (मेटलाईफ स्टेडियम) मध्ये खेळवला जाईल. हे स्टेडियम अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यात आहे, जिथली सध्याची वेळ भारताच्या वेळेपेक्षा (IST) ९ तास आणि 30 मिनिटे मागे आहे. मार्च ते नोव्हेंबर दरम्यान भारत आणि न्यू जर्सीच्या वेळेत 9 तास आणि 30 मिनिटांचा फरक असतो. या गणितानुसार भारतात फिफा वर्ल्ड कप फायनलच्या वेळेत किती फरक पडेल, ते आपण जाणून घेऊया.
न्यू जर्सीच्या स्थानिक वेळेनुसार (Local Time), फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना 19 जुलै (रविवार) रोजी दुपारी 3:00 वाजता सुरू होईल.
भारत या वेळेपेक्षा 9 तास आणि 30 मिनिटे पुढे आहे. त्यामुळे, भारतात फिफाचा हा अंतिम सामना 20 जुलै (सोमवार) रोजी मध्यरात्री 12:30 वाजता (12:30 AM) सुरू होईल. साहजिकच, भारतीय चाहत्यांना हा अंतिम सामना पाहण्यासाठी आपल्या झोपेचा त्याग करावा लागणार आहे.
या स्पर्धेतील पहिला उपांत्य (सेमीफायनल) सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात स्पेनने फ्रान्सचा २-० असा पराभव करत १६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर फायनलमध्ये धडक मारली. यापूर्वी स्पेनच्या संघाने २०१० मध्ये फायनलमध्ये प्रवेश केला होता आणि नेदरलँड्सचा पराभव करत आपले पहिले जेतेपद पटकावले होते. स्पेनचा संघ फायनलमध्ये पोहोचण्याची ती पहिलीच वेळ होती. आता २०२६ मध्ये हा संघ दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे.
यानंतर दुसरा उपांत्य सामना इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात झाला. या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाने २-१ असा विजय मिळवून फायनलमधील आपले स्थान निश्चित केले. आता अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरतो की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Comments are closed.