IND vs ENG: प्रशिक्षक गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला भोवले! दुसऱ्या वनडेत भारताची दाणादाण
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा वनडे सामना खेळला जात असून टीम इंडिया आजच्या सामन्यात 233 धावांवर आटोपली. त्यामुळे आता टीम इंडियाकडून वनडे रँकिंगमधील ‘नंबर-1’ चा ताज देखील हिरावला जाणार का? हा प्रश्न कार्डिफमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यातल्या कामगिरीमुळे उपस्थित होत आहे.
कारण, एका वेळी भारताची धावसंख्या 330 पर्यंत जाईल असं वाटतं असताना अखेर संघ केवळ 233 धावांवरच रोखला गेला. केएल राहुल (KL Rahul) आजारी असल्यामुळे संघात नव्हता, पण त्याच्या अनुपस्थितीत प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी टीम इंडियाला जणू प्रयोगशाळा बनवून टाकलं आहे.
टॉप ऑर्डरच्या तीन फलंदाजांनंतर, पुढचा फलंदाज कोण येणार, हे कोणालाच समजत नव्हतं. भारतीय संघाने शेवटच्या 55 धावांमध्ये 7 विकेट्स गमावल्या. 178 धावांवर विराट कोहली (Virat Kohli) बाद झाला आणि त्यानंतर संपूर्ण फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) 2023 पासून वनडेमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे आणि तो चांगल्या फॉर्मातही आहे. वर्ल्ड कपला आता एकच वर्ष बाकी असताना चौथ्या क्रमांकाचा फलंदाज निश्चित असायला हवा होता. तरीही, ईशान किशनला (Ishaan kishan) चौथ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय समजण्यापलीकडे आहे.
केएल राहुलच्या जागी ईशान किशनला संघात घेतले होते, जो सहसा पाचव्या क्रमांकावर खेळतो. किशन सुरुवातीपासूनच फटकेबाजीसाठी संघर्ष करताना दिसला आणि केवळ 1 धाव काढून बाद झाला. सुदैवाने श्रेयस अय्यरने 66 धावांची अर्धशतकी खेळी केली, त्यामुळे भारतीय संघाला थोडा आधार मिळाला.
गौतम गंभीर यांच्याकडून झालेली आणखी एक मोठी चूक म्हणजे रोहित शर्मा बाद झाला तेव्हा श्रेयस अय्यरला न पाठवणे. रोहित चुकीचा फटका मारून बाद झाला असला तरी, अय्यर आणि विराट कोहलीने 67 धावांची भागीदारी करून हे सिद्ध केले होते की, तिथे ‘लेफ्ट-राइट कॉम्बिनेशन’ची (डाव्या-उजव्या हाताच्या फलंदाजाची) कोणतीही गरज नव्हती. तरीही प्रयोग करण्याच्या नादात टीम इंडियाला मोठ्या फटका बसला. आता टीम इंडिया हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेणार का याकडे चाहत्यांच लक्ष असणार आहे.
Comments are closed.