खलिल शेख आत्महत्या प्रकरणात रविंद्र धंगेकर अडचणीत, 10 जणांवर गुन्हा दाखल, अटकेची शक्यता
पुणे : खलिल शेखला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मवसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिस आरोपींचा शोध घेत असून अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
रविंद्र धंगेकर यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलिल शेख याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी खलिल शेख यांनी व्हिडिओ चित्रित केला होता, त्या व्हिडिओत आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींची नाव घेतलं होती. खलिल शेख यांना वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये फसवण्यात आल्याचा दावा त्यांचा होता. रविवार पेठेतील वक्फ बोर्डाच्या जमिनीचा होता. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर उत्कर्ष असोसिएटकडून इमारत बांधण्यात येत होती. उत्कर्ष असोसिएटमध्ये खलिल शेख यांच्यासोबत माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्या पत्नीसह आणखी इतर दोन जण असे एकूण पाच भागीदार होते. या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली होती.
रविंद्र धंगेकरांकडून भाजप नेत्यांनी त्या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली असं सांगण्यात आलं आहे. प्रकल्पाला स्थगिती मिळाल्यानं प्रकल्प रेंगाळला, यामुळं बँकेंचं कर्ज भरता आलं नाही, त्यातून विंवचना आली त्यामुळं खलिल शेख यांनी आत्महत्या केली असं रविंद्र धंगेकर यांचं म्हणनं होतं. मात्र, खलिल शेख यांनी रविंद्र धंगेकर आणि बाळा शेडगे त्यांचे 50 लाख रुपये दिले नाहीत, त्यामुळं आत्महत्या करतोय, असं म्हटलं होतं. एकूण 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील कलमांनुसार 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्यानं अटकेची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आहे.
रविंद्र धंगेकर काय म्हणाले?
माझ्या पत्नीनं या कंपनीतून 2025 मध्ये बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. खलिल शेख याचं आणि आमचं बोलणं झालेलं नाही. आर्थिक व्यवहार कंपनीसोबत झाले आहेत, आम्ही कंपनीचे आर्थिक व्यवहार सांभाळत नव्हतो. आता गुन्हा दाखल झाला हा भाग तपासला पाहिजे. या प्रकल्पाचा राजकारणातून बळी देण्यात आला आहे. मी आमदार झालो म्हणून या प्रकल्पाचं नुकसान झालं आहे. यातील सगळे भागीदार देशोधडीला लागलो आहोत. आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू, असं रविंद्र धंगेकर म्हणाले.
दरम्यान, कर्जबाजारी झालेल्या खलील शेख याने गुलटेकडी भागातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय. रविंद्र धंगेकर आर्थिक अडचणींकडे दुर्लक्ष करत असल्याचं खलिल शेखनं म्हटलं होतं.
Comments are closed.