फुकट्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेची तिकिट तपासणी मोहिम तीव्र; महिनाभरात 13.13 कोटी दंडवसुली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फाईळ फोटो

फुकट्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने कारवाई तीव्र केली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत 1 जून 2026 ते 9 जुलै 2026 दरम्यान विनातिकिट प्रवास करणाऱ्या 2.10 लाख प्रवाशांकडून 13.13 कोटी रुपये दंड वसुल केला आहे.

1 जून 2026 ते दिनांक 19 जून 2026 या कालावधीत, तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची 1.14 लाख प्रकरणे उघडकीस आणली. या प्रवाशांकडून तत्कालीन किमान 250 रुपये दंडानुसार 6.15 कोटी रुपये वसूल केले. फुकट्या प्रवासाला आळा घालण्यासाठी आणि तिकीटविषयक नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. 19 जून 2026 पासून विनातिकीट प्रवासासाठी किमान दंड 250 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत वाढवला आहे.

दंडाच्या रकमेत वाढ केल्यानंतर 20 जून 2026 ते 9 जुलै 2026 या कालावधीत 96,026 प्रकरणे शोधून 6.98 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. वसूल केलेल्या एकूण दंडामध्ये वातानुकूलित उपनगरीय लोकलमधील 18,756 प्रकरणांतून 78.31 लाख रुपये आणि प्रथम श्रेणीतील डब्यांमधील 13,198 प्रकरणांतून 53.31 लाख रुपयांचा समावेश आहे.

Comments are closed.