धक्कादायक! जळगावात धावत्या बसमधून सराफा व्यवसायिकाची 25 लाखांची बॅग लंपास, चार आरोपींना अटक
जळगाव क्राईम न्यूज : जळगाव जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या बसमधून सराफा व्यवसायिकाची 25 लाख रुपयांची बॅग लंपास करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना 25 लाखांच्या रोकडसह अटक करण्यात आली आहे. नितीन पुरुषोत्तम वाणी हे सराफ व्यावसायिक प्रफुल्ल सुराणा यांच्या सुवर्ण पेढीसाठी कोल्हापूर येथे चांदी खरेदी करण्यासाठी 25 लाख रुपयांची रोकड घेऊन ट्रॅव्हल्सने जात असताना चौघ चोरट्यांनी बॅग लंपास केली होती.
सोनू उर्फ राम भगवान सारवाण, शेख रहेमान शेख निसार, सचिन उर्फ मंगेश झांबरे आणि दशरथ चौधरी अशा अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. धावत्या लक्झरी बसमधून चोरी झालेली 25 लाख रुपयांची पूर्ण रोकड हस्तगत केली आहे. चार सराईत आरोपींसह गुन्ह्यात वापरलेली मारुती डिझायर कारही जप्त केली आहे. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना पकडले.
गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे 5 लाख रुपये किमतीची मारुती डिझायर कारही जप्त
धावत्या लक्झरी बसमधून 25 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेणाऱ्या चार सराईत आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांच्या आत अटक केली आहे. चोरीस गेलेली संपूर्ण 25 लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे 5 लाख रुपये किमतीची मारुती डिझायर कार असा एकूण 30 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही घटना 11 जुलै रोजी घडली होती. नितीन पुरुषोत्तम वाणी हे सराफ व्यावसायिक प्रफुल्ल सुराणा यांच्या पेढीसाठी कोल्हापूर येथे चांदी खरेदी करण्यासाठी 25 लाख रुपयांची रोकड घेऊन ट्रॅव्हल्स’ने निघाले होते.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना अटक
फर्दापूर येथील हॉटेलवर जेवणासाठी बस थांबली असता त्यांनी रोकड असलेली बॅग बसमध्येच ठेवली होती. जेवण करून परत आल्यानंतर बॅग गायब झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान सराईत गुन्हेगार सोनू उर्फ राम भगवान सारवाण याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या तीनसाथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार शेख रहेमान शेख निसार, सचिन उर्फ मंगेश झांबरे आणि दशरथ सुरेश चौधरी यांनाही अटक करण्यात आली. चौघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीची संपूर्ण 25 लाख रुपयांची रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेली मारुती डिझायर कार जप्त करण्यात आली. आरोपींना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Comments are closed.