केतन अग्रवाल हत्येप्रकरणी पोलिसांना चकवा देण्यासाठी प्लॅन, सिया-चेतननं जपानी व्हिडिओ पाहिले

पुणे : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज वडगाव न्यालयात हजर करण्यात आलं होतं. आजच्या सुनावणीनंतर सिया गोयल आणि चेतन चौधरीची न्यायालयीन कोठडी  29 जुलैपर्यंत वाढण्यात आली आहे. केतन अग्रवालच्या हत्येनंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी सिया गोयल आणि चेतन चौधरीनं जपानी व्हिडिओ पाहिल्याचं समोर आलं आहे. तर, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या  लग्नासंदर्भात तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक राजस्थानातील खाटुशाम मंदिरात पोहोचलं आहे.

सिया गोयल आणि चेतन चौधरीनं पाहिले जपानी व्हिडिओ

आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी केतनच्या हत्येपूर्वी अटक आणि पोलीस चौकशीतून बचावासाठी काही जपानी व्हिडिओ पाहिले असल्याचं समोर आलं आहे.  दोन तासांचे जपानी व्हिडिओ सिया आणि चेतनने पाहिल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीत शांत राहून कशी उत्तर द्यायची या संदर्भात जपानी व्हिडिओ पाहून माहिती सिया आणि चेतनने मिळवली.पोलिसांनी सिया आणि चेतनच्या वेब हिस्ट्रीतन दोन्ही व्हिडिओची लिंक मिळवली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

18 जूनला केतन अग्रवालची हत्या करायचं हे आधीच ठरलेलं होतं आणि हत्येचा आधी बनाव करायचा की तो अपघात आहे आणि हा अपघाताचा बनाव किंवा अपघाताच बिंग जरी फुटलं आणि आपल्याला अटक केली तर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी पुढची ही तयारी करून ठेवलेली होती.ती तयारी म्हणजे पोलीस चौकशीला कसं सामोर जायचं आणि यासाठीच त्यांनी काही जापनीज व्हिडिओपाहिले होते. तब्बल दोन तासांचा जापनीज व्हिडिओ आहे आणि त्याच्या काही लिंक ज्या आहेत त्या मोबाईल डेटा जो रिकव्हर करण्यात आला त्यामध्ये सापडल्याची माहिती आहे. पोलीस सूत्रांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक राजस्थानात

पुणे ग्रामीण पोलीसांच पथक राजस्थान मधील खाटुशाम मंदिरात तपासासाठी पोहोचलं  होतं. या मंदिरातील सीसीटीव्ही तपासण्यासाठी पोलीस तिथे पोहोचले होते. डिसेंबर महिन्यात सिया अणि चेतन त्यांच्या मित्र मैत्रिणींसह राजस्थानला पिकनिकसाठी गेले होते. तेव्हा ते दोघे या मंदिरात देखील गेले होते. तिथं या दोघांनी लग्न केलं होतं का याचा तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांच पथक राजस्थान मधील खाटुशाम मंदिरात तपास करण्यासाठी दाखल झालं होतं. सिया आणि चेतन यांच्या मोबाईल चॅटचा तपास केल्यानंतर दोघं एकमेकांना पती – पत्नी समजत होते, अशी माहिती समोर आली आहे. ते दोघे एकमेकांशी बोलताना पती पत्नी प्रमाणे बोलत होतें. त्यामुळे त्यांनी खरंच लग्न केलं होतं का याचा तपास करण्यासाठी पोलिस खाटुशाम मंदिरात पोहोचले आहेत. तीन दिवसांपासून इथले सीसीटीव्ही तपासले जातायेत.

हेदेखील वाचा

Comments are closed.