Beed News – विकासाच्या नावाखाली फक्त बोगसगिरी, ४८ लाखाचा पूल एका लाथेने पडला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गल्ली ते दिल्ली विकासाच्या नावाखाली फक्त आणि फक्त बोगसगिरी सुरू आहे. मिसिंग लिंकचा तमाशा सगळ्या जगाने बघीतल्यानंतर नांदेडच्या पुलाचे वास्तव समोर आले. आता तर खेड्यापाड्यातही तोच प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. केज तालुक्यात नाल्यावर बांधलेला ४८ लाख रूपयाचा पुल एका पठ्ठ्याने लाथेने पाडला. यावरूनच त्या कामाचा दर्जा आणि विकासाचे स्वप्न कसे साकार होत आहे हे स्पष्ट होते.

केज तालुक्यातील बनकरंजा येथील बनकरंजा ते चिंचपूर या रस्त्यावर गावाच्या जवळ असणार्‍या नदीवर ४८ लाख रूपयाचा पूल बांधण्यात आला. काम अर्धवट आहे. मात्र या कामाचा दर्जा बघून डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. ज्या गावाने विकासाची कामे करून राज्यात पहिला क्रमांक मिळवला त्या बनकरंजा गावाचा विकास एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला. बांधकाम झालेला पूल एका पठ्ठ्याने एका लाथेत पाडला. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम, कामामध्ये मुरूमाऐवजी माती, सिमेंटऐवजी मुरूम वापरल्याचे दिसत आहे. पुलाला जेथे तेथे भगदाड पडलेले. अंथरलेल्या नळ्याही फुटलेल्या, चांगला पाऊस झाला आणि या नदीला पूर आला तर अख्खा पूलच वाहून जातो की काय अशी शंका निर्माण होत आहे. गावातील काही तरूणांनी या बोगसगिरीचा पर्दाफाश केला. या गावात असेच विकासाचे अनेक कामे झाली आहेत. या पुलाच्या कामावरून त्या विकास कामाचा दर्जाही लक्षात येतो. संतप्त तरूणांनी एका लाथेत पाडलेल्या पुलाचा व्हिडिओ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना पाठवला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अधिकार्‍यांच्या डोळे उघडले. आपण दोन दिवसात चौकशीला येवू असा निरोप त्या अधिकार्‍यांनी पाठवला. खालपासून वरपर्यंत सध्या राज्यात कमिशनचे राज्य आहे. अधिकारी लोकप्रतिनिधींना भेईनात, गुत्तेदार अधिकार्‍यांना भेईनात, कोणाचे कोणावरही निंयंत्रण राहिले नाही. जो आवाज उठविल त्याला खिंडीत पकडण्याचे काम चालू आहे.

Comments are closed.