बीडमध्ये चाललंय काय? गेवराईत कुटुंबातील 8 जणांवर कोयता व रॉडने वार, एकाचे डोके फोडले

अंडे: बीडमध्ये नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. माजलगाव शहरात खुनाची दोन प्रकरणं ताजी असताना आता गेवराई तालुक्यातील वाहेगाव येथे आठ जणांवर कोयता आणि रॉडने हल्ला झाला आहे. याप्रकरणी मात्र अद्याप पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही. ही घटना 16 एप्रिल रोजी घडली असून या जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घराच्या गेटला वारंवार टँकर का धडकवतो? अशी विचारणा केल्याचा राग मनात धरून गेवराई तालुक्यातील वाहेगावात राहणाऱ्या पठाण कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी असून इतर तिघेजण किरकोळ जखमी आहेत. यातील एका व्यक्तीच्या डोक्यात 48 टाके पडले असून डोकं पूर्णपणे रक्तानं माखल आहे. तर इतर गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. (Beed Crime)

दरम्यान माजलगावात ढाबा मालक आणि त्याच्या मुलावर प्राण घातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार रात्री उघडकीस आला होता. यात गंभीर जखमी असलेल्या बाप लेकावर उपचार सुरू होते. यात महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असतानाच गेवराईत घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

नक्की घडले काय?

बीडमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हेगारीने कळस गाठल्याचे चित्र कायम आहे.  घराच्या गेटला वारंवार टँकर का धडकवतो? असा जाब विचारल्याचा राग मनात धरून गेवराई तालुक्यात वाहेगावात राहणाऱ्या पठाण कुटुंबातील आठ जणांवर कोयता आणि रॉडने हल्ला करत त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे.  या गंभीर घटनेत पठाण कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले असून एकाच्या डोक्यात 48 टाके पडले आहेत. किरकोळ कारणांवरून वाद झाल्याने ही मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यात कोयता हल्ल्यात जखमी झालेल्या पाच ते सहा जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

माजलगावमध्ये  ढाबा मालक व मुलावर प्राणघातक हल्ला

बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये ढाबा मालक आणि त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महादेव गायकवाड आणि त्यांचा मुलगा या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असतानाच महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गायकवाड यांना डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा:

https://www.youtube.com/watch?v=rflktg58rk4

अधिक पाहा..

Comments are closed.