बीडमधील दहशतीचा पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल; कोयते, सत्तुराने तरुणावर वार, अश्लील शिवीगाळ

बीड गुन्हा: बीड शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. नुकताच एका तरुणावर हातात कोयते आणि सत्तुर घेऊन हल्ला करतानाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, पुन्हा एकदा बीडमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुण एका युवकाला धमकावत असल्याचे दिसत आहे. दोघांच्या हातात धारदार कोयते आणि सत्तुर असून, ते त्या युवकाला शिवीगाळ करत धमकावत आहेत. “आता तुझ्यावर वार करतो” असे म्हणत ते त्याच्यावर धावून जातात. काही क्षणांतच त्यांनी शेख असीम या तरुणावर हल्ला केला. हल्ल्यात असीमच्या हातावर गंभीर इजा झालीय. जखमी असीम याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी त्याला एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. असीमवर धारदार शस्त्राने वार झाल्याने त्याला टाके घालावे लागले असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

गुन्हा अद्याप दाखल नाही, पोलीस गप्प?

या गंभीर हल्ल्यानंतरही अद्याप बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे आरोपींचे चेहरे आणि त्यांचं हिंसक वर्तन दिसून येत असतानाही पोलिसांची कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बीड शहरात याआधीही अनेक वेळा धारदार शस्त्राच्या दहशतीची आणि किरकोळ कारणांवरून होणाऱ्या मारहाणींची प्रकरणं समोर आली आहेत. मात्र तरीही अशा प्रकारांवर आळा घालण्यात प्रशासन अपयशी ठरतंय का, असा सवाल उपस्थित होतो आहे.या घटनेमुळे पुन्हा एकदा बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

जालन्यात क्रीडा प्रबोधनीत चार विद्यार्थिनींचा विनयभंग

बीडमध्ये कोचिंग क्लासमधील अल्पवयीन मुलीवर झालेलं अत्याचार प्रकरण ताजे असताना जालना शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील गांधी चमन परिसरात असलेल्या क्रीडा प्रबोधनीमध्ये कार्यरत असलेल्या क्रीडा शिक्षकावर चार विद्यार्थिनींच्या विनयभंगाचा आरोप झाला आहे. या प्रकरणी जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी क्रीडा शिक्षकाला अटक केली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.