आधी पूजानं टाळलं, तिच्या आईलाही आली नाही दया, गोळी झाडण्याआधी गोविंदचा फोन; खळबळजनक माहिती समोर
बीड क्राइम माजी डिप्टी सरपंच मृत्यू: बीड जिल्ह्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Ex deputy sarpanch Govind Barge Death Case) यांच्या आत्महत्येने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. नर्तकी पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून झालेली फसवणूक, मालमत्तेवर तगादा, तसेच ब्लॅकमेलिंगच्या प्रकारामुळे गोविंद यांनी थेट स्वतःवर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली असून, तिच्याकडून चौकशी सुरू आहे. आता गोविंद बर्गे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? याबाबत माहिती समोर आली आहे.
गोविंद बर्गे यांची पूजा गायकवाड हिच्याशी ओळख एका कला केंद्रात झाली होती. काही काळातच दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. प्रेमात गुंतलेल्या गोविंदने पूजासाठी महागडे दागिने, मोबाईल, मोटारसायकल, प्लॉट, शेती आणि इतर अनेक मौल्यवान वस्तू दिल्या. याशिवाय, गेवराई येथे एक भव्य बंगलाही उभारला, ज्यामध्ये गोविंदच्या पत्नीसह मुले आणि वडील राहत होते.
बंगल्यावर मालकीसाठी तगादा, गुन्ह्याची धमकी
पूजा काही दिवस त्या बंगल्यात राहिल्यानंतर तिने हा बंगला स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी गोविंदवर तगादा लावला. गोविंदने समजावण्याचा प्रयत्न करत, “तुझ्यासाठी दुसरा बंगला उभारतो” असे सांगितले, मात्र पूजा त्यावर ठाम नव्हती. उलट, तिने गोविंदला “बंगला माझ्या नावावर केला नाहीस, तर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवीन” अशी धमकी दिली आणि त्याच्याशी सर्व संपर्क तोडला.
पूजाच्या वागणुकीमुळे गोविंद तणावात
पूजाच्या या वागणुकीमुळे गोविंद मोठ्या तणावात गेला होता. घटनेच्या दिवशी तो तिला भेटण्यासाठी कला केंद्रात गेला, मात्र ती तिथे नव्हती. त्यानंतर तिच्या मैत्रिणीकडून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच यश मिळाले नाही. अखेरीस गोविंद थेट पूजाच्या घरी गेला आणि तिच्या आईशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. “पूजाला काहीतरी समजवा, ती माझ्याशी बोलत नाही” अशी त्याने विनंती केली, पण तिच्या आईकडूनही कोणतीही मदत मिळाली नाही.
पूजाच्या घराबाहेरच संपवलं आयुष्य
या सर्व अपमान व तणावामुळे खचलेला गोविंद पूजाच्या घराबाहेर गाडीमध्ये बसूनच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पूजा गायकवाडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. गोविंदच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी पूजावर गंभीर आरोप केले आहेत. “तिने प्रेमाच्या नावाखाली आर्थिक लूट केली, भावनिक त्रास दिला आणि ब्लॅकमेल केलं,” असे त्यांनी म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
बीड क्राइम एक्सपी सरपनाच मृत्यू: नार्टाकी पुजन उगडलन तोंड, गोविंद बार्ज आणि तिचा लव्हबाबा.
आणखी वाचा
Comments are closed.