‘पायावर नाही… मुंडक्यावर मारा’; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी

बीड क्राईम न्यूज: बीडच्या परळीत जुन्या भांडणाचा राग आणि राजकीय वैमनस्यातून एका 29 वर्षीय तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. चांदापूर रोडवरील पेट्रोल पंपासमोर असलेल्या एका हॉटेलवर चहा पीत असताना अभिजीत नागेश कांबळे या तरुणाला गाठले नंतर त्याला लोखंडी रॉड आणि कोयत्याने बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्याचे दोन्ही हात,पाय फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Maharashtra Crime news)

या प्रकरणातील फिर्यादीने तक्रारीत नमूद केलेली बाब म्हणजे, मारहाण सुरू असताना नगरसेवक नितीन रोडे यांनी व्हिडिओ कॉलवरून “पायावर मारू नका, मुंडक्यावर मारा… त्याचं मुंडक माझ्याकडे आणा” असा आदेश दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणात अभिजीत कांबळे याच्या फिर्यादीवरून नितीन रोडे, आनंद कांबळे, सुरेश चौंडे, रतन आदोडे, संतोष इंदरकर उर्फ बन्नी, रोहन उर्फ गब्बर साळवे, दत्ता कुरूप यांच्यासह इतरांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून परळी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत. (Beed news)

अभिजीत नागेश कांबळे हा तरुण परळीतील भीमनगरचा रहिवासी आहे. तो गेल्या तीन-चार वर्षांपासून परळीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहे. नितीन रोडे हेदेखील अजित पवार गटाचे नगरसेवक असून ते भीमनगरमधून निवडून आले आहेत. नितीन रोडे हा धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक आहे. धनंजय मुंडे यांच्यासोबत त्याचे सोशल मीडीयावर अनेक फोटो आणि व्हिडीओ आहेत. नितीन रोडे याने गेल्या वर्षांमध्ये दिवसांमध्ये राजकीय आशीवार्दाच्या बळावर परळीत स्वत:ची चांगलीच दहशत निर्माण केली असून तो अनेकांना त्रास देत असल्याची चर्चा आहे. नितीन रोडे मित्रपरिवार आणि डी कंपनी या दोन ग्रूपच्या माध्यमातून ते आपला कारभार परळीत चालवतात.

Beed SIR: मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस? परळीत बीएलओला मारहाण

बीडच्या परळीत बीएलओला लाथा बुक्क्यांनी मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडलीये.सध्या एस आय आर नोंदणीचा दुसरा टप्पा सुरू असून शहरातील पेठ मोहल्ला येथे असलेल्या शादी खाना कॅम्पमध्ये बीएलओ म्हणून काम करणारे शिक्षक महफूज जाकीर शेख यांना कॅम्प मध्ये येत मतदानाचे फॉर्म घेऊन आमच्या घरी का येत नाही असे म्हणत चौघांकडून चापटा बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

इतकंच नाही तर या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा मागे घेतला नाहीस तर आम्ही बाहेर येऊन तुला बघून घेऊ या भाषेत धमकी दिली. दरम्यान या प्रकरणी शाकीर अहमद शेख,जुनेद शेख, शोएब शेख आणि एक अनोळखी इसम अशा चौघा विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास परळी शहर पोलीस करत आहेत.

आणखी वाचा

Navi Mumbai Crime: एकनाथ शिंदेंच्या शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखाला अटक, भंगारवाल्याकडून दोन लाखांची खंडणी मागितली, नकार मिळताच मारहाण

Comments are closed.