बडतर्फ रणजीत कासलेच्या अडचणीत आणखीन वाढ; अंबाजोगाई चौथा गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर
बीड क्राइम न्यूज: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसह (Walmik Karad) माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर थेट आरोप करणाऱ्या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेंच्या (Ranjeet Kasale) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. रणजीत कासलेविरोधात आणखी एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या शैक्षणिक शुल्कासाठी पैशांची गरज आहे म्हणून सुदर्शन काळे यांच्याकडून दहा लाख रुपये उसने घेत त्यातील अडीच लाख रुपये परत न केल्याच्या आरोप कासलेंवर करण्यात आले आहेत. या प्रकरणात रणजीत कासले याच्यावर अंबाजोगाई (Ambajogai) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा
पुढे आलेल्या माहितीनुसार, परळी विधानसभा निवडणूक काळात स्ट्रॉंग रूमपासून दूर राहण्यासाठी मला धनंजय मुंडे यांच्या माणसाने दहा लाख रुपये दिल्याचा दावा कासले यांनी केला होता. परंतु आता त्याचा हा दावा खोटा असल्याचे समोर आले असून त्याने पैसे परत न केल्याने काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रंजीत कासले हा साध्या छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
जेलमध्ये रणजीत कासलेला धोका? तातडीने हर्सुल कारागृहात हलवलं
दुसरीकडे, बीड कारागृहात असलेल्या रणजीत कासले (Ranjeet Kasale) याला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रणजीत कासलेला बीड कारागृहातून (Beed Crime news) हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडसह (Walmik Karad) सुदर्शन घुले आणि इतर आरोपी बीड कारागृहात आहेत. अशातच रणजीत कासलेने वाल्मीक कराड याच्यावर गंभीर आरोप केले होते. ॲट्रॉसिटी प्रकरणात सध्या रणजीत कासले न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने त्याची रवानगी हर्सुल कारागृहात करण्यात आली. कासले विरोधात बीड जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाणे, अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे आणि परळी पोलीस ठाण्यात कसले विरोधात गुन्हे दाखल आहेत.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस अलर्ट
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस अलर्ट झाले आहे. पोलिसांनी शोध घेतला असता आत्तापर्यंत जिल्ह्यात एकही पाकिस्तानी नागरिक आढळून आलेले नाही. मात्र गोपनीय पोलिसांकडून पाकिस्तान आणि बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू आहे. नागरिकांना संशयास्पद कोणी आढळल्यास त्याची माहिती द्यावी. असे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.