माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट होता; जीवघेणा हल्ला झालेल्या PAचा दावा; घटनेचे सीसी


बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई येथील घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही (CCTV footage) फुटेज घेऊन आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित (Amarsinh Pandit) यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे. गेवराईचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे भाऊ त्रिंबक पवार यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्या गेवराईतील कृष्णाई निवासस्थानी जाऊन स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचाच कट रचल्याचा दावा डावखर यांच्या माध्यमातून करण्यात आला होता. (CCTV footage)

दरम्यान या संपूर्ण घटनेची लेखी तक्रार आणि सीसीटीव्ही फुटेज पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे भाऊ त्रिंबक पवार आमच्या गाड्यांना धडक देऊन आमच्यावर हल्ले करण्यासाठी आले होते. हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये आले आहे. त्रिंबक पवार यांच्याकडून 25 ते 30 वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेल्या व्यक्तीला मारण्याचे कटकारस्थान करण्यात आले त्यामुळे सामान्य व्यक्तींचे तिथे काय आहे. या प्रवृत्ती आणि व्यक्तीपासून धोका असल्याचे आमदार विजयसिंह पंडित यांनी म्हटले आहे.

ही संपूर्ण घटना घडल्यानंतर अद्याप पवार कुटुंबाकडून माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. यावरूनच आमदार विजयसिंह पंडित यांनी पवार कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. पवार विकृत विक्षिप्त मनोवृत्तीचे आहेत, अशा घटना करत असताना त्यांना काहीही भान नसते. घटना घडल्यानंतर ते तोंड लपून फिरत असल्याची टीका पंडित यांनी केली आहे.

बीड क्राईम न्यूज : माजी आमदार पंडित यांच्या स्विय सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

बीडच्या गेवराईमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या गेवराई येथील कृष्णाई कार्यालयामध्ये आठ ते दहा जणांनी हल्ला केला होता. यामधील एक हल्ल्यादरम्यानचा सीसीटीव्ही समोर आला आहे. आरोपी एका चार चाकी गाडीतुन येत आहेत कार्यालयाबाहेरील स्कॉर्पिओ गाडीला धडक देऊन उतरल्यानंतर पळत जात आहेत. यासंदर्भात थोड्या वेळापूर्वीच आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली आहे. तर हा हल्ला माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येच्या उद्देशाने झालेला होता असा दावा आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह अमरसिंह पंडितांचे स्वीय सहाय्यक डावखर यांनी केलेला आहे.

Beed Crime News: नेमकं काय घडलं?

माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या घरी जाऊन त्यांचे स्वीय्य सहाय्यक अमृत डावखर यांना बेदम मारहाण करण्यात आली. लाठ्या-काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आल्याची माहिती अमृत डावखर यांनी दिली आहे. बाळराजे पवार यांनी आपल्यावर हल्ला करण्यापूर्वी अमरसिंह पंडित यांच्या बाबत विचारणा केली, त्यांच्या खुनाचा कट रचूनच ते घरी आले होते, त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आलेला होता असा थेट दावा डावखर यांनी केला आहे.

त्याचबरोबर बाळराजे यांच्याबरोबर काही अनोळखी लोक होते. माझा देखील जीव गेला असता, मात्र गाडी चालकाने मला सोडवलं. अशा प्रकारचा धक्कादायक दावा, अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांनी केला आहे. यासंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. डावकर यांच्यावर सध्या बीड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.