बीडमध्ये हुंडाबळी; सासरच्या मंडळींकडून वारंवार जाच, विहिरीत आढळला नवविवाहितेचा मृतदेह, दोन महिन
बीड : पुण्यात गाजलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती बीडमध्ये झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथे सोनाली बाळू वनवे (वय २२) हिने सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. हुंड्यासाठी केलेल्या त्रासामुळे या तरुणीचा बळी गेला असून पोलिसांनी तिच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथील सोनाली बाळू वनवे हिचा जंबुरावस्ती येथील अनिकेत गर्जे याच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. अवघ्या एक महिन्यानंतर सासरच्या मंडळींनी पाच लाख रुपयांची मागणी करायला सुरुवात केली. सोनालीच्या माहेरच्या लोकांनी पाच लाख रुपये नेऊन दिले. मात्र मला आता तू आवडत नाहीस, मला तुझ्या सोबत राहायचे नाही असा वाद घालत नवऱ्यासह सासरच्यानी वारंवार त्रास दिला होता.
मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा
याबाबतची माहिती सोनालीने तिच्या आईला आणि माहेरच्या लोकांना दिली होती. मात्र त्रास कमी झाला नाही. अखेर 31 ऑगस्ट रोजी सोनाली बेपत्ता झाली आणि तिचा शोध घेतला असता सासरी तिच्या घराशेजारीच असलेल्या एका विहिरीत सोनालीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचं पोलीस पंचनाम्यात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान तलवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनिकेत गर्जे, सासरा एकनाथ गर्जे, सासु प्रतिभा गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे.
३१ ऑगस्ट रोजी सोनाली अचानक बेपत्ता झाली
सोनालीचा दोन महिन्यांपूर्वी जंबुरा वस्ती येथील अनिकेत गर्जेशी विवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच सासरच्या मंडळींनी पाच लाख रुपयांची मागणी सुरू केली. सोनालीच्या माहेरकडून ही रक्कम दिल्यानंतरही “मला तू आवडत नाहीस, तुझ्यासोबत राहायचं नाही” असे कारण देत तिच्यावर अत्याचार सुरूच राहिले. सततचा छळ सहन होत नसल्याने सोनालीने आपली व्यथा आईला सांगितली होती, मात्र यात काहीही फरक पडला नाही. ३१ ऑगस्ट रोजी सोनाली अचानक बेपत्ता झाली. शोध घेतला असता घराशेजारील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये हळहळ पसरली असून त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
तलवाडा पोलीस ठाण्यात पती अनिकेत गर्जे, सासरा एकनाथ गर्जे आणि सासू प्रतिभा गर्जे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या तिघांना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, वारंवार घडणाऱ्या हुंडाबळीच्या घटनांमुळे पुन्हा एकदा हुंडाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.