Beed Crime : बायको नांदायला येईना, दारुच्या नशेत पतीने थेट सासर्याचं घरच पेटवलं
बीड गुन्हे: बीडच्या पिंपळा धायगुडा येथून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आला आहे. यात नशेत असलेल्या जावयाने सासऱ्याच्या घरालाच पेट्रोल टाकून आग (Fire) लावल्याची धक्कादायक घटना समोर (Beed Crime News) आली आहे. पतीच्या दारूच्या सवयीला कंटाळून मागील आठ दिवसापासून पत्नी पिंपळा धायगुडा येथे माहेरी राहत होती. यानंतर पतीने थेट सासरवाडी गाठत पत्नीला नांदायला येण्याची मागणी केली. मात्र यावर पत्नीने ‘तुम्ही पिणे बंद करा, मगच मी येईल’ असे सांगितल्यावर पतीने सोबत आणलेल्या कॅनमधून घराच्या दरवाजावर आणि खिडकीतून आत पेट्रोल ओतून आग लावून दिली.
दरम्यान, या आगीमध्ये घरातील गृहपयोगी साहित्य जळून खाक झाल्यात. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेजाऱ्यांनी आग विजवल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी पत्नीच्या सुलोचना राहुल जगताप यांच्या फिर्यादीवरून पती राहुल दत्तोपंत जगताप याच्या विरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Bhandara News : 10 टक्के व्याजदरानं सावकारी करणाऱ्या पती-पत्नीवर गुन्हा दाखल
गरजू नागरिकांना दिलेली रक्कम 10 टक्के व्याजदरानं बळजबरीनं आणि छळ करून वसूल करणाऱ्या पती-पत्नीच्या विरोधात भंडाऱ्याच्या पवनी पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संदेश खोब्रागडे आणि रेखा खोब्रागडे असं या पती-पत्नी सावकारांचं नावं आहे. यात एका महिला आणि एका पुरुषाच्या तक्रारीवरून या पती-पत्नी विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आल्यानं अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिलेनं रेखा खोब्रागडे हिच्याकडून 3.50 लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं. त्या बदल्यात महिला सावकार असलेल्या रेखा खोब्रागडेनं 13 लाख 80 हजारांची वसुली केली. याही उपरांत कर्जदार महिलेच्या घरी जाऊन शिवीगाळ आणि मानसिक छळ केल्याचं तक्रारीत नमूद आहे. तर, पुरुष कर्जदारांना संदेश खोब्रागडे कडून 3 लाख 30 हजारांचं कर्ज घेतलं होतं. त्या बदल्यात त्याच्याकडून 3 लाख 43 हजार रुपये व्याजासह वसूल केल्यानंतरही बळजबरीने घेतलेल्या एका धनादेशाच्या माध्यमातून 3 लाखांचा तो धनादेश बँकेत वटविण्याकरिता टाकला. मात्र बँक खात्यात पैसे नसल्यानं धनादेश वटला नाही. त्यामुळे संदेश खोब्रागडे या सावकाराने पुरुष कर्जदाराकडून स्टॅम्प पेपरवर पैसे परत करण्यासाठी तगादा लावला धमकावलं असं पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद आहे. महिला आणि पुरुष कर्जदाराच्या तक्रारीवरून पवनी पोलिसात पती-पत्नी खोब्रागडे सावकार दांपत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.