कोणावर मोक्का, तर कोणावर खंडणी, मारहाण, खुनाचा..; मोक्कांतर्गत कारवाई केलेल्या वाल्मीक कराड गँग
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुंड गोट्या गित्ते याच्यासह सात जणांवर पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे. तडोळी येथील एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. परळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी सहदेव सातभाई यांच्यावर 18 ऑक्टोबर 2023 साली हल्ला झाला होता. लोखंडी रॉड फरशी आणि काठीने मारनकर यांना गंभीर जखमी केले होते. तसेच सातभाई यांच्या जवळील दोन लाख 70 हजार रुपये रक्कम देखील जबरदस्तीने काढून घेतली होती. या प्रकरणात कारवाई करत रघुनाथ फड,जगन्नाथ फड, सुदीप सोनवणे,बालाजी दहिफळे, विलास गित्ते या पाच जणांना अटक झाली होती. सुदीप सोनवणे वगळता इतरांना जामीन मिळाला आहे. तर धनराज फड आणि ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते हे फरार आहेत.
मका अंतर्गत रणशिंगाखाली आली
1) रघुनाथ फड
2) जगन्नाथ फड
3) सुदीप सोनावणे
4) बाळाजी दहिफळे
5) विलास गित्ते
6) धनराज उर्फ राजेभाऊ फड
7) ज्ञानदेव उर्फ गोट्या गित्ते
या टोळीतील सर्वजण हे वाल्मीक कराडचे समर्थक होते. गोट्या गित्ते हा तर वाल्मिक कराडला पुण्यातून बीडला आणताना त्याच्या ताफ्यात होता. तर सुदीप सोनवणे हा बीड कारागृहात कराड आणि गित्ते गँग यांच्या झालेल्या वादाचे कारण होता.
मोक्कांतर्गत कारवाई केलेल्या कराड समर्थक असलेल्या गँग आरोपीचे प्रोफाइल
1) रघुनाथ फड
रघुनाथ फड हा परळी जवळ असलेल्या रामनगर येथील रहिवासी आहे.
खंडणी,मारहाण,खुनाचा प्रयत्न करणे असे अनेक गुन्हे रघुनाथ फड याच्यावर दाखल आहेत
बापू आंधळे खून प्रकरणात देखील रघुनाथ फड याच्यावर गुन्हा दाखल आहे
2) जगन्नाथ फड
जगन्नाथ फड हा परळीतील सोमेश्वर नगर भागातील रहिवासी आहे
परळीतील बहुचर्चित असलेल्या संगीत डिघोळे हत्या प्रकरणात हा आरोपी होता
याच्यावर देखील विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत
बीड जिल्हा कारागृहात बबन गित्ते आणि कराड गॅंग मध्ये झालेल्या मारहाण प्रकरणात सहभागी होता.
3) सुदीप सोनवणे
सुदीप सोनवणे हा परळीतील सिद्धार्थ नगर भागातील रहिवासी आहे
बीड जिल्हा कारागृहातील मारहाण प्रकरणात देखील याचा सहभाग होता
4) बालाजी दहिफळे
बालाजी दहिफळे हा परळीतील माणिक नगर भागातील रहिवासी आहे
याच्यावर देखील अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत
5) विलास गित्ते
विलास गित्ते हा परळी जवळ असलेल्या नंदागौळ येथील रहिवासी आहे
हा देखील सुरुवातीला बबन गित्ते गँग मध्ये सक्रिय होता पुढे त्याने कराड चे काम करणे पसंद केले
6) धनराज उर्फ राजेश फड
धनराज उर्फ राजेश फड हा सुरुवातीला बबन गित्ते गॅंग मध्ये सक्रिय होता. इतकंच नाही तर तो बबन गित्ते याच्या सर्वाधिक जवळचा कार्यकर्ता होता
पुढे वाल्मीक कराड याने बबन गित्तेची गॅंग फोडली आणि त्यावेळेसच अनेक कार्यकर्त्यांसह राजेश फड याने राष्ट्रवादीत प्रवेश केला.
या प्रवेशासाठी राजेश फड याला मोठी रक्कम एक गाडी देण्यात आल्याचे बोलले जाते.प्रवेशानंतर राखेच्या वाहतुकीचे काम देखील तो करत होता.बापू आंधळे खून प्रकरणात देखील राजेश फड याच्यावर गुन्हा दाखल आहे.
7) ज्ञानदेव उर्फ गोट्या गित्ते
– ज्ञानोबा उर्फ (गोट्या) मारुती गित्ते हा नंदागौळ येथील रहिवासी आहे गेले 15 वर्षापासून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत.
– चोऱ्या करणे,धमकावणे यासह गावठी कट्टे बाळगणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.हे गुन्हे बीड जिल्ह्यासह पुण्यातही दाखल आहेत.
– परळीत बापू आंधळे खून प्रकरणात महादेव गित्तेवर गुन्हा दाखल झाला होता.जखमी असलेल्या महादेव गित्ते याने गोट्या गित्ते चे नाव घेतले होते त्यानंतर गोट्या गित्तेवर देखील गुन्हा दाखल झाला होता.
बीड जिल्हा कारागृहात बबन गित्ते वाल्मीक कराड गँग झालेल्या राड्यात मोक्का मधील चौघांचा समावेश आहे. जिल्हा कारागृहात बबन गित्ते वाल्मीक कराड गँगमध्ये राडा झाला होता. यावेळी महादेव गित्तेला जेलमध्ये धमकी देण्यात आली होती.वाल्मीक कराडला जेलमध्ये ज्या सुविधा मिळत आहेत त्याला महादेव गित्ते विरोध करत होता म्हणूनच हा मारहाणीचा प्रकार झाला. वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून सुदीप सोनवणे,रघुनाथ फड,जगन्नाथ फड, बालाजी दहिफळे यांनी जेलमध्ये मारहाण केल्याचे महादेव गित्तेच्या पत्नीने सांगितले होते.
अधिक पाहा..
Comments are closed.