बीडच्या कोचिंग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी मोठी अपडेट; दोन्ही आरोपी शिक्षकांना जामीन मंजूर
बीड क्राइम न्यूज: बीड शहरातील उमीकरण संकुलनातील कोचिंग क्लासेसमधील एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ (Crime News) प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना बीड न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. एका कोचिंग क्लासमधील 17 वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा (Beed Sexual Harassment case) दाखल झाला होता. त्यावरून पोलिसांनी मांजरसुंबा येथून दोघांना अटक केल्यानंतर त्यांना सुरुवातीला पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान, विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. 17 जुलै रोजी पोस्को अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात या दोघांना जामीन मिळाल्यानंतर आता विनयभंग प्रकरणात देखील न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला. आरोपींच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ बाळासाहेब कोल्हे यांनी काम पाहिले.
पोस्को अंतर्गत दाखल गुन्ह्यानंतर आता विनयभंग प्रकरणात देखील जामीन मंजूर
मात्र पोलिसांनी या घटनेत तपास करत असताना लॅपटॉप, मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवले होते. तसेच 30 पेक्षा अधिक जणांचे जबाब देखील नोंदवले होते. अशातच प्रशांत खाटोकर व विजय पवार यांना न्यायालयासमोर हजर केले असता यापूर्वी त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर पोस्को अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात दोघांना जामीन मिळाल्यानंतर आता विनयभंग प्रकरणात देखील न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागले असून या प्रकरणी दाद मागण्यासाठी बळी कुटुंब वरच्या न्यायालयात जातात च्या हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे?
बीडमध्ये बाललैंगिक अत्याचारांचे 78 गुन्हे
बीडमध्ये शाळा, क्लासेस आणि अगदी घरातही मुली असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रत्येक दोन दिवसांनी एक बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याची जिल्ह्यात नोंद होतेय. मागील पाच महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराचे तब्बल 78 गुन्हे नोंद झालेत. यातील 42 गुन्हे अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराचे तर 36 गुन्हे विनयभंगाचे आहेत. धक्कादायक म्हणजे पाच महिन्यांत एकूण बलात्काराच्या घटनांमध्ये 49 टक्के पीडिता अल्पवयीन आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.