डमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू, पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

बीड क्राइम न्यूज: बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटन घडली आहे. याप्रकरणी पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यातच आला आहे. पत्नीने पतीला लाथा बुक्क्यांनी गंभीर मारहाण केली होती, यामध्येच घाव वर्मी लागल्याने पतीचा मृत्यू झाला आहे.

अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल

अंबाजोगाई शहर पोलीस (Ambajogai Police) ठाण्यात पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास सरवदे असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे. कैलास सरवदे यांचे सात वर्षांपूर्वी माया नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. मायाचे हे दुसरे लग्न होते. कैलास हा नेहमी दारु प्यायचा त्यामुळं त्यांच्यात नेहमी वाद होत असायचे. अशाच वादातून मायाने कैलासला मारहाण केली, यामध्ये तो बेशुद्ध पडला. त्याला नातेवाईकांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर त्याचा मृत्यू मारहाणीमुळं झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे शहरातही घडली धक्कादायक घटना

धुळे शहरातील स्नेहनगर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे (Sonal Shinde) यांचा मुलगा विराज शिंदे (Viraj Shinde) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (11 सप्टेंबर) रात्री उशिरा उघडकीस आली असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Dhule Crime News) विशेष म्हणजे मंगळवारीच (9 सप्टेंबर) विराजचा वाढदिवस कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत आनंदात साजरा करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्याच्या अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्यामाहितीनुसार, आत्महत्येच्या दिवशी विराज घरी एकटाच होता. कुटुंबीय बाहेर गेले असताना त्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. काही वेळानंतर कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ विराजला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याचा मृत्यू आधीच झाल्याचे घोषित केले.

महत्वाच्या बातम्या:

Dhule Crime: धुळे हादरलं, माजी स्थायी समिती सभापतींच्या मुलानं आयुष्य संपवलं, वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसात…

आणखी वाचा

Comments are closed.