दुचाकी पार्क करण्यावरुन वकिलाला मारहाण, बीड न्यायालयाच्या परिसरात घडली घटना, गुन्हा दाखल

बीड क्राईम न्यूज : बीडच्या जिल्हा न्यायालय परिसरात दोन महिलांसह एका पुरुषाने वकिलाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वकील संघाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महिलेसह इतर दोघांविरोधात तक्रार दिली आहे. न्यायालय परिसरात घडलेल्या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला. ज्यात महिला आणि वकिलामध्ये झटापट झाल्याचे दिसून येतं आहे. सदरील घटना घडल्यानंतर महिलेनेच वकीला विरोधात तक्रार दिली आहे.

दुचाकी पार्क करण्याच्या मुद्यावरुन झाला वाद

किसन करपे नावाचा व्यक्ती सहकाऱ्यांसोबत न्यायालय परिसरात आला होता. याच दरम्यान वकील पांडुरंग डोंगरे यांच्या टेबल समोर त्याने आपली दुचाकी पार्क केली. टेबल समोर दुचाकी लावू नये अशी विनवणी वकिलाने केली. याच कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला. सोबत असलेल्या महिलांनी वकिलाला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत वकील संघाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली आहे.

पुण्यात काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावरही हल्ला

काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याची घटना काल (सोमवारी, ता २३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मित्रमंडळ चौकाजवळ घडली. यावेळी पिस्तुलाचा धाक (Pune Crime News) दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप हनुमंत पवार यांनी दामगुडे यांच्यावर केला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण (Pune Crime News) केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. तर हिंदुत्ववादी कार्यकर्ता तुषार दामगुडेसह तिघांविरुद्ध गुन्हा (Pune Crime News) दाखल केला आहे. तर तुषार दामगुडेजवळ असलेलं परवानाधारक शस्त्र पोलिसांनी जप्त केलं आहे. दामगुडे आणि इतरांना पोलिसांनी नोटीस देऊन सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Crime News) हनुमंत पवार  यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यांनी आपल्या मातृसंघटनेच्या संस्कारांना जागून गृहमंत्रिपदाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत आहे. तरीदेखील आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आरोपींवर कठोर कारवाईची अपेक्षा ठेवत आहोत असे पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Hanumant Pawar Crime: काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण, पोलिसांनी तुषार दामगुडेची रिव्हॉल्व्हर जप्त केली अन् नोटीस देऊन घरी सोडलं

आणखी वाचा

Comments are closed.