बीड नगरपरिषद निवडणुकीत प्रचंड राबला, वडिलांना विजय मिळवून दिला अन् आयुष्य संपवलं, शरद पवार गटाच

बीड: बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या  नवनिर्वाचित नगरसेवकाच्या ३२ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पवन अशोक काळे असे आत्महत्या (Beed Crime News) केलेल्या तरुणाचे नाव आहे. पवनचे वडील अशोक काळे प्रभाग क्रमांक एक मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नुकतेच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. वडिलांच्या प्रचारार्थ स्वतः पवन काळे यांचा सक्रिय सहभाग होता. पवनने वडिलांचा प्रचार करून युवकांचे संघटन उभे केले होते, पवनचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तर अद्याप या आत्महत्येमागील कारण समजू शकलेलं नाही.(Beed Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील जालना रोड परिसरातील काझीनगर भागात ही घटना घडली आहे. बीड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार अशोक काळे विजयाचा आनंद उत्सव साजरा करत असतानाच त्यांच्या ३२ वर्षीय मुलांने घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.  पवन अशोक काळे असं (वय 32) गळफास घेतलेल्या तरुणाचं नाव आहे.(Beed Crime News)

पवन काळे यांनी बीड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मात्र, पवन काळे यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचचलं, आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Beed Crime News: वडिलांच्या विजयाचा आनंद साजरा केला अन्..

बीड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये पवन यांचे वडील अशोक काळे हे 21 डिसेंबरला लागलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये विजयी झाले होते. प्रचारादरम्यान पवन हा वडिलांच्या विजयासाठी निवडणूक प्रचारात सक्रिय होता. निकालानंतर अशोक काळे विजयी झाल्यानंतर सगळ्यांनी एकच जल्लोष केला होता. यावेळी विजयी मिरवणुकीत पवन सुद्धा सामील होता. नगर परिषदेत विजयामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं, पण अचानक पवनने टोकाचे पाऊल का उचललं असा सवाल उपस्थित होत आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.